हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय लोकांच्या मनावर गेल्या 20 वर्षांपासून राज्य करणारी महिंद्रा स्कार्पिओ लवकरच आपल्या नव्या (New Mahindra Scorpio) अवतारात येणार आहे. कंपनीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ येत्या जून महिन्यात बाजारात दाखल होऊ शकते. महिंद्राने सर्वप्रथम 2002 साली आपली पहिली स्कॉर्पिओ गाडी लॉन्च केली होती. त्यानंतर या गाडीला ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. ऑफ रोडसाठी स्कॉर्पिओ सर्वांचा बाप ठरली. आता स्कॉर्पिओचं नवं मॉडेल लवकरच लॉंच होणार असल्याने तुम्ही एखादी SUV गाडी घेण्याचा प्लॅन करत असाल तर जरा थांबलात तर उत्तम होऊ शकेल.
अशी आहेत गाडीची वैशिष्ट्य
महिंद्रा स्कॉर्पिओ SUV च्या नवीन फोटोंवरून असं दिसतंय कि, हि नवी स्कॉर्पिओ (New Mahindra Scorpio) एकदम हटके डिझाईन करण्यात आली आहे. पुढच्या बाजूला एकदम नवीन 6-स्लॅट ग्रील देण्यात आले आहेत जे XUV700 च्या तुलनेत लहान आहेत. या गाडीमध्ये क्रोम ट्रीटमेंटसह पहिल्यापेक्षा जास्त शार्प दिसणाऱ्या हेडलाईट बसवण्यात आल्या आहेत. या टॉप मॉडेलमध्ये LED हेड लॅम्प असणार आहेत. याशिवाय मोठा फ्रंट बम्पर, फॉग लॅम्प आणि डीआरएल मिळणार आहे. ही गाडी पहिल्यापेक्षा मोठी, लांब आणि बसण्यास ऐसपैस असणार आहे.
अत्याधुनिक केबिन
या नव्या (New Mahindra Scorpio) मॉडेलमध्ये एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असणार आहे आणि एक मोठा इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन डॅशबोर्डच्या मध्यभागी असणार आहे. गाडीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनमध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी वेगवेगळे एसी आणि ब्लोअर कंट्रोल देण्यात आले आहेत. या नवीन गाडीचे डिझाईन करताना प्रवाशांच्या सोयीचा विचार करून अनेक गोष्टींची काळजी घेतल्याचे दिसते. त्यामुळे गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी ही गाडी पर्वणी ठरणार आहे.
इंजीन आणि क्षमता
या नव्या स्कॉर्पिओमध्ये (New Mahindra Scorpio) थार प्रमाणे 2.2 लिटर डिझेल आणि 2 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजीन असणार आहे. थारप्रमाणेच एक नवीन लैडर फ्रेम चेसिस असणार आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत या टॉप मॉडेल मध्ये ऑल व्हील ड्राईव्हचा पर्याय असणार आहे. लोअर व्हेरिएन्टमध्ये पावर केवळ रियर व्हील्सवर ट्रांसमीट केली जाण्याची सुविधा आहे. या चमचमत्या गाडीच्या खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार याबाबत माहिती नाही. पण 12 ते 20 लाखाच्या दरम्यान या गाडीची किंमत असेल असा अंदाज आहे.
हे पण वाचा –
http://Kia Carens CNG : कियाची कॅरेन्स लवकरच येणार सीएनजी मध्ये; Ertiga ला देणार तगडी फाईट
Mahindra Bolero : दमदार इंजिन अन् ड्युअल एअरबॅगची सिस्टीम; महिंद्राची नवी बुलेरो पहाच