Mahindra Bolero : दमदार इंजिन अन् ड्युअल एअरबॅगची सिस्टीम; महिंद्राची नवी बुलेरो पहाच….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या (Mahindra Bolero) गाड्या या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य म्हणून ओळखल्या जातात. त्यातच आता महिंद्राने आपली नवीन बुलेरो कार लॉन्च केली आहे. महिंद्राची ही सात सीटर एसयूव्ही तिच्या मजबूतपणामुळे आणि कोणत्याही खडबडीत रस्त्यावर सहजतेने फिरण्याच्या क्षमतेमुळे लोकप्रिय आहे. यापूर्वी ही कार फक्त ड्रायव्हर-साइड एअरबॅगसह उपलब्ध होती. पण आता सरकारी नियमानुसार या कार मध्ये ड्युअल एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत.

भारत सरकारच्या नव्या नियमानुसार, आता सर्व कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज अनिवार्य आहे. त्यामुळे महिंद्रा अँड महिंद्राने सुद्धा आपली लोकप्रिय एसयूव्ही बोलेरो अद्यतनित केली आहे आणि कार मध्ये ड्युअल एअरबॅग लावले आहेत. आता सामान्य SUV महिंद्रा बोलेरो पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित वाटत आहे. महिंद्र बोलेरोच्या ड्युअल एअरबॅग प्रकारांच्या किंमती आणि वैशिष्ट्यांसह सर्व गोष्टींबद्दल चला जाणून घेऊया. (Mahindra Bolero).

Mahindra Bolero

सुरक्षितता वैशिष्ट्ये –

नवीन ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज कारची अनेक सुरक्षा वैशिष्ट्य आहेत जसे की ABS सह EBD , रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स इत्यादी. तसेच स्पीड अलर्ट संपूर्ण श्रेणीमध्ये मानक म्हणून समाविष्ट आहेत

वैशिष्ट्ये –

पॅसेंजर साइड एअरबॅगचा अपवाद वगळता, बोलेरोच्या या कार मध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. याचा अर्थ AUX आणि USB कनेक्शनसह ब्लूटूथ-सक्षम म्युझिक सिस्टम, मॅन्युअल एअर कंडिशनर, कीलेस एंट्री, पॉवर स्टीयरिंग आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये मिळत राहतील.

Mahindra Bolero

कोणकोणत्या रंगांचा पर्याय-

महिंद्राची ही नवी बोलेरो फक्त तीन पांढरा, सिल्वर कलर आणि ब्राऊन कलर या ३ मोनोटोन कलर मध्ये उपलब्ध असेल.

इंजिन आणि पॉवर (Mahindra Bolero) –

महिंद्रा बोलेरोला पूर्वीप्रमाणेच 1.5-लिटर, 3-सिलेंडर डिझेल mHawk75 इंजिन देण्यात आले आहे . हे इंजिन 75hp पॉवर आणि 210Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले असून ते फक्त मागील चाकांना पॉवर जनरेट करते.

Mahindra Bolero

काय आहे नवीन किंमत –

महिंद्राची बोलेरो B4, B6 आणि B6 Opt. या ३ ट्रिम लेव्हल मध्ये उपलब्ध आहे. ड्युअल एअरबॅगच्या एअरबॅग्समुळे या गाडीच्या किमतीत वाढ झाली आहे. कारच्या प्रकारानुसार किमती 14,000 ते 16,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. महिंद्रा बोलेरो B4 व्हेरियंटची किंमत 9 लाख रुपये आहे. B6 व्हेरिएंटची किंमत 9.8 लाख रुपये आहे. त्याच वेळी, टॉप मॉडेल B6 च्या पर्यायी व्हेरियंटची किंमत 10 लाख रुपये आहे. (Mahindra Bolero)

नवीन नियम कधीपासून लागू झाला –

भारतात विकल्या जाणार्‍या सर्व नवीन वाहनांसाठी अनिवार्य मानक म्हणून ड्युअल एअरबॅग्ज बसवण्याचा निर्णय जानेवारी 2022 पासून लागू झाला. यापूर्वी मारुती सुझुकी अल्टो आणि S-Presso, Renault Kwid आणि Mahindra Bolero सारख्या अनेक बजेट कार फक्त ड्रायव्हर साइड एअरबॅगसह आल्या होत्या. यामध्ये, प्रीमियम किंवा टॉप-स्पेक मॉडेलसाठी पर्याय म्हणून पॅसेंजर साइड एअरबॅग देण्यात आली होती.

हे पण वाचा –

Car Loan : सणासुदीच्या काळात तुम्हीही ऑटो लोन घेणार असाल तर ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होऊ शकेल नुकसान

Mahindra & Mahindra ने पूर्ण केली 76 वर्षे, आनंद महिंद्रांकडून सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन; त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या