सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात लाॅकडाऊन लावल्यानंतरही रूग्णसंख्या कमी होत नसल्याने आता सोमवारपासून (दि.24) कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच होणार अंमलबजावणीस सुरूवात होणार आहे. भाजीपाला, किराणा विक्री, हॉटेल सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
कडक लाॅकडाऊनमध्ये दूधविक्रीस केवळ दोन तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर पेट्रोल फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी मिळणार आहे, जिल्हाधिकारी शेखर सिन्हा यांनी शनिवारी सायंकाळी नावा आदेश काढलेला आहे.
खालील सेवा पूर्ण बंद राहतील
हॉटेल, बार, भाजीपाला विक्री, सर्व किराणा दुकाने, मॉल, बाजार, मार्केट, व्यापारी दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळविक्रेते, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई फेरीवाले, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादी विक्री करणारी दुकाने, वाहनाच्या सेवेसाठी असणारे गॅरेज,स्पेअरपार्ट पुरवठा करणारी दुकाने, बांधकाम पूर्णपणे बंद राहील.