नवीन संसद भवन आहे खूपच आकर्षक; पहा Inside Photos…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी दिल्लीतील नवीन संसद भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 31 जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच नव्या संसद भवनाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. नवे संसद भवन देशाची नवी ओळख बनेल. नव्या संसद भवनाचे फोटो पाहताच तुमच्या लक्षात लक्ष्यात येईल की आधी पेक्षा हे संसद भवन खूपच आलिशान आणि सुंदर आहे.

new parliament

संसदेची नवीन इमारत 64,500 चौरस मीटर परिसरात बांधण्यात आली आहे. यामध्ये 1,000 हून अधिक खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. नवीन संसद भवनात लाकडी संरचना वापरण्यात येणार आहे.

new parliament

संसदेच्या नवीन इमारतीचे कंत्राट 2020 मध्ये टाटा प्रकल्पांना 861.9 कोटी रुपयांना देण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांची किंमत वाढवून सुमारे 1,200 कोटी रुपये करण्यात आली.

new parliament

नव्या संसद भवनाचे काही फोटो समोर आले असून त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या नव्या दालनात खासदारांना बसण्यासाठी खुर्च्याही लावण्यात आल्याचे दिसत आहे.

new parliament

हे संसद भवन फक्त दिसायलाच आकर्षक नाही तर सुरक्षेच्या दृष्टीनेही अतिशय मजबूत आहे. नवीन संसद भवन पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक असल्याचे सांगण्यात येत आहे. या संसद भवनाची रचना एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केली आहे.

new parliament

नवीन संसद भवन चार मजली आहे. याठिकाणी लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल आणि कॅन्टीनसह अनेक सुविधा उपलब्ध आहे.

new parliament

नवे संसद भवन हे मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. जेव्हा पंतप्रधान मोदींनी 2020 मध्ये जेव्हा या नव्या संसदेची पायाभरणी केली होती तेव्हा देशभरातील विरोधकांनी याला विरोध केला होता. केंद्र सरकार पैशाची उधळपट्टी करतंय असाही आरोप सरकारवर करण्यात आला होता. मात्र आता ही इमारत तयार होणार आहे.