हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न आता थेट कोर्टात गेला आहे. त्यातच आता शिंदे यांनी शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. शिंदे यांच्याकडून कोणत्या नेत्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आली आहे हे पाहूया..
दीपक केसरकर – मुख्य प्रवक्ते
गुलाबराव पाटील – प्रवक्ते
उदय सामंत – प्रवक्ते
शीतल म्हात्रे – प्रवक्ते
किरण पावसकर – प्रवक्ते
संजय मोरे – शिवसेना सचिव
डॉ. बालाजी किणीकर – खजिनदार
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी नव्याने जाहीर केली होती. शिंदे गटात ४० आमदार आणि १२ खासदार असून खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून केला जात आहे. हा मुद्दा आता कोर्टात असून १ ऑगस्टला यावर होणाऱ्या सुनावणी कडे संपूर्ण देशाचे लक्ष्य असणार आहे.