टीम हॅलो महाराष्ट्र । तुम्ही जर आपल्या आधार आणि पॅनचा तपशील आपल्या कंपनीला दिला नसेल तर सावधान! नवीन आयकर नियमानुसार तुमच्या पगारात कपात केली जाऊ शकते. प्राप्तिकर विभागाच्या (कर विभाग) नियमानुसार जर एखादा कर्मचारी आपल्या कंपनीला पॅन आणि आधार क्रमांक देत नसेल तर 20% टीडीएस (कर वजावट स्त्रोत) त्याच्या पगारामधून वजा केला जाईल. आधीच लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न कमवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा नियम लागू होणार आहे.
हा नियम का आणला गेला
हा नवीन नियम केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) बनविला असून १६ जानेवारीपासून लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार वार्षिक अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळणाऱ्या कारभाऱ्यांवर लागू होईल. या नियमामुळे टीडीएस देयकेवर लक्ष ठेवण्याबरोबरच या विभागातील महसुलातही वाढ होईल, असे सांगण्यात येत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलनापैकी ३७ टक्के कर या विभागातून संकलित केला गेला.
नवीन आयकर नियमांबाबत ८६ पानांचे परिपत्रक जारी
सीबीडीटीने ८६ पानांच्या जरी केलेल्या परिपत्रकात आयबीसीटीच्या कलम २०६-एए अंतर्गत कर्मचार्यांना त्यांच्या कंपनीला पॅन आणि आधार क्रमांक देणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे. या परिपत्रकात असेही म्हटले आहे की जर एखादा कर्मचारी या दोन्ही माहिती देत नसेल तर नियोक्ता एकतर त्यांच्या वार्षिक पगारावर कर कमी करू शकतो किंवा वार्षिक पगारामधून २०% वजा करू शकतो.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे पुढील आठवड्यात सलग ३ दिवस बँका राहणार
#Budget2020: यंदाच्या अर्थसंकल्पात इनकम टॅक्स स्लॅबमध्ये होऊ शकतो मोठा बदल
#Budget2020: म्युच्युअल फंडमधून पैसे कमविणाऱ्यांना ‘या’ करातून मिळू शकते सवलत