हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन New Train For Marathwada। मराठवाडयातील प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आणि पंजाबला जोडणारी फिरोजपूर- हुजूर साहिब एक्सप्रेस ट्रेन (१४६२२/१४६२१) आजपासून सुरु करण्यात आली आहे. हि एक साप्ताहिक ट्रेन सेवा आहे जी आठवड्यातून एक दिवसच प्रवाशांच्या सेवेत असेल. ही ट्रेन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील ३५ वेगवेगळ्या स्थानकांना कव्हर करेल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे नांदेड येथील शीख तीर्थस्थळाला भेट देणाऱ्या प्रवाशांना चालना मिळेल असं म्हंटल जातंय.
शीख भाविक नांदेड साहिबसाठी रवाना – New Train For Marathwada
नांदेड-अमृतसर ही दोन प्रमुख शीख तीर्थस्थळांना जोडणारी लांब पल्ल्याच्या ट्रेन आहे. ही नवीन ट्रेन औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांना (New Train For Marathwada) सेवा देईल. आज शुक्रवारी फिरोजपूर कॅन्ट रेल्वे स्टेशनवरून नांदेड साहिबसाठी हि साप्ताहिक ट्रेन रवाना झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने शीख भाविक नांदेड साहिबसाठी रवाना झाले ही ट्रेन आमच्यासाठी खूप महत्वाची असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. दुसरीकडे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं कि, फिरोजपूर कॅन्ट आणि नांदेड दरम्यान नवीन ट्रेन सुरू झाल्यामुळे सामान्य जनता, विद्यार्थी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना परवडणाऱ्या भाड्यात लांब पल्ल्याच्या प्रवास करता येईल. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राशी रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत होईल. पूर्वी प्रवाशांना गाड्या बदलाव्या लागत होत्या पण आता या थेट ट्रेन सेवेमुळे प्रवास सोपा होईल आणि प्रवाशांचा वेळ सुद्धा वाचेल.
कस असेल रेल्वेचं वेळापत्रक –
फिरोजपूर कॅन्टहून नांदेड साहिबला जाणारी नवीन साप्ताहिक ट्रेन (क्रमांक १४६२२/१४६२१) दर शुक्रवारी दुपारी १:२५ वाजता फिरोजपूरहून निघेल आणि रविवारी पहाटे ३:०० वाजता नांदेड साहिबला पोहोचेल. यानंतर परतीच्या प्रवासात, हीच ट्रेन रविवारी सकाळी ११.५० वाजता नांदेडहून निघेल.आणि मंगळवारी पहाटे ४.३० वाजता पुन्हा फिरोजपूर कॅन्टला पोहोचेल. तब्बल २०२० किमी प्रवास या रेल्वेच्या माध्यमातून होईल. नांदेड मध्ये शीख गुरुद्वार आहे, तर पंजाब मध्ये सुद्धा शीख धर्मीय लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे या रेल्वेला धार्मिक नाळही जोडलेली आहे. New Train For Marathwada
तिकीट किती असेल-
सामान्य वर्ग भाडे ४५५
स्लीपर भाडे ७६०
3E भाडे 1905
3AC भाडे 2015
2AC भाडे 2930




