हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारांनी लसीकरणावर भर देण्याचे ठरवले आहे. अशातच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविडशील्ड’ या लसीचे दर जाहीर केले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य सरकारांना सिरमची कोविडशिल्ड ही लस 400 रुपये प्रति डोसच्या हिशेबानं तर खासगी रुग्णालयाला सिरमची लस 600 रुपये प्रति डोसच्या हिशेबाने देणार आहेत. एकूण लसीच्या उत्पादनाच्या 50 टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी दिला जाणार आहे. तसेच उर्वरित राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना दिला जाईल अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली आहे.
Following the Govt of India directives, we are announcing the prices of the Covishield vaccine – Rs 400 per dose for state governments and Rs 600 per dose for private hospitals: Serum Institute of India (SII) #COVID19 pic.twitter.com/xU54SUPbiE
— ANI (@ANI) April 21, 2021
त्यांनी म्हटलं आहे की,’ पुढील दोन महिन्यांमध्ये आम्ही लसींचे उत्पादन वाढ होणार असून लसींची कमतरता भरून काढणार आहे’. अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट कडून देण्यात आलेली आहे.
पुढील पाच महिन्यानंतर कोविड शिल्ड ही लस रिटेल आणि फ्री ट्रेडमध्ये कोणत्याही ठिकाणी उपलब्ध असेल. असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान सिरम च्या कोविडशिल्ड चे दर इतर देशाच्या लसीच्या तुलनेत कमी असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे. अमेरिकेच्या लसीची किंमत भारतीय रुपयांप्रमाणे 1500 रशियन लसीची किंमत 750 रुपये आणि चिनी लसीची किंमत ही 750 रुपये असल्याचं सिरमने म्हटलं आहे.