नवीन प्रभाग रचनांमुळे बदलणार सीमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासन कामाला लागले असून, लोकसंख्या व मतदार संख्या विचारात घेऊन वॉर्डांची चतु:सीमा ठरविल्या जाणार आहेत. त्यामुळे जुन्या वॉर्डांच्या सीमांमध्ये 10 टक्के बदल अपेक्षित असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार होणार असून, प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने काम सुरू केले आहे. शहरात आता 38 प्रभाग होणार आहेत. 37 प्रभाग तीन सदस्यांचे तर एक प्रभाग चार सदस्यांचा राहणार आहे. प्रभाग रचना करताना तीन वॉर्ड एकत्र केले जाणार आहे. प्रत्येक प्रभागाची मतदार संख्या 20 ते 25 हजारांच्या घरात राहणार आहे. प्रभाग रचना करताना लोकसंख्या व मतदार संख्येचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे वॉर्डांची चतु:सिमा बदलली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात देखील 10 टक्के बदल अपेक्षीत असल्याचे नमूद केले आहेत. तसेच प्रभाग तयार करताना मुख्यरस्ता नाला, नदी, डीपीमधील नऊ मीटरचा रस्ता याचा विचार करण्यात यावा, अशा सूचना देखील आयोगाने प्रशासनाला दिल्या आहेत. गेल्यावेळी काढण्यात आलेल्या वॉर्ड रचनेवर मोठ्या प्रमाणात वाद झाले. पुढे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यामुळे यावेळी प्रशासन काळजी घेईल, असा अंदाज बांधला जात आहे. 115 वॉर्डांपैकी महिलांसाठी 58 जागा तर पुरुषांकरिता 57 जागा असतील.

Leave a Comment