हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Webseries) मराठी कलाविश्वात कायम वेगवेगळे प्रयोग पहायला मिळतात. त्यामुळे गेल्या काही काळात मराठी कलाकृतींचा प्रेक्षक तुफान वाढताना दिसला आहे. न केवळ तर नाटकांचासुद्धा एक वेगळा प्रेक्षक आहे. जो विविध कलाकृतींचे भरभरून कौतुक करत असतो. अशाच रंगभूमीवर तुफान गाजलेले ‘पुरुष’ हे नाटक एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहे. सिद्धहस्त लेखक जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या नाटकावर आधारित वेब सिरीज लवकरच आपल्या भेटीस येत आहे.
‘पुरुष’वर आधारलेली वेब सिरीज (New Webseries)
जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेले आणि मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘पुरुष’ हे नाटक पुरुषी मनोवृत्तीचे दर्शन घडवते. मुख्य म्हणजे ज्यांचा उल्लेख गेंड्याची कातडी असलेला पुढारी असा केला जातो, अशा लोकांची मानसिकता दाखवणारी ही कलाकृती आहे. त्यामुळे रंगभूमीवर या नाटकाने प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवले होते. या नाटकातील गुलाबराव जाधव हे पात्र चांगलंच गाजलं होतं. हे पात्र अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारले होते. यानंतर वेबसीरिजमध्ये हे पात्र कोण साकारणार अशी उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. या नाटकातील अंबू हे पात्र त्यावेळी रिमा लागू यांनी साकारले होते. याही पात्राविषयी विशेष उत्सुकता पहायला मिळते आहे.
पुरुष नाटकाचे दर्जेदार कथानक
जयवंत दळवी यांचे ‘पुरुष’ हे नाटक १९८२ साली रंगभूमीवर आले. ज्यामध्ये नाना पाटेकर, रीमा लागू, चंद्रकांत गोखले, उषा नाडकर्णी, सतीश पुळेकर अशी स्टार कास्ट होती. या नाटकाची नायिका अंबिका आहे. (New Webseries) जिचे वडील शिक्षक असून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. अशा एका शिक्षकाच्या घरातली मुलगी पुरुष प्रधान संस्कृतीसोबत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आहे.
पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून तिला काम करायचं आहे. हे पाहून गुलाबराव जाधव या निर्ढावलेल्या पुढाऱ्याला पुरुषी अहंकार दुखावतो आणि तो तिच्यावर बलात्कार करतो. या आघाताने अंबिका खचून जाईल असे त्याला वाटते. पण या प्रसंगानंतर ती आणखीच पेटून उठते आणि गुलाबरावला धडा शिकते. असे या नाटकाचे कथानक आहे. जे आता प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून वेब सीरिज स्वरूपात अवतरत आहे. (New Webseries)
कोण साकारणार गुलाबराव आणि अंबिका?
प्लॅनेट मराठीच्या या आगामी वेबसीरिजचा प्रोमो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याची सुरुवात फोनवरील संवादाने होते. या संवादातून ही वेबसीरिज पुरुषप्रधान असेल, याचा अंदाज येतो. या नाटकाची मुख्य पात्र गुलाबराव आणि अंबिका आहेत. ही दोन पात्र मराठी कलाविश्वात दिग्गज मंडळी साकारणार असल्याचे समजत आहे. (New Webseries) वेबसिरीजमध्ये गुलाबराव ही भूमिका अभिनेते सचिन खेडेकर तर अंबिका ही भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडे साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसन्न आजरेकर, श्रीरंग गोडबोले आणि अभिजित पानसे ही वेबसीरिज घेऊन येत आहेत. ज्याची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर यांनी केली आहे.