हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. या महिन्यात तुम्हाला लवकरात लवकर बँकेची कामे (Bank Holiday) करावी लागणार आहेत. कारण या महिन्यात 1 -2 दिवस नाहीतर तब्बल 14 दिवस बँक (Bank Holiday) बंद राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जर बँकेत जाऊन कामं करायचं असेल तर तुम्हाला अगोदरच नियोजन करावे लागणार आहे. आता नेटबँकिंगमुळे बरीच कामं घरबसल्या होतात. मात्र चेक किंवा मोठे व्यवहार किंवा काही फॉर्म भरण्याची कामं पेन्शन अशा काही गोष्टी बँकेत (Bank Holiday) जाऊन कराव्या लागतात. त्यामुळे या कामांसाठी तुम्ही सुट्ट्यांची लिस्ट पाहूनच नियोजन करा.
रिझर्व्ह बँका ऑफ इंडिया दर महिन्याला सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2023 सालच्या बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holiday) यादी जाहीर केली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात बऱ्याच सुट्ट्या आल्या आहेत.जानेवारीत चार रविवार असतात. या दिवशी बँकेत साप्ताहिक सुट्टी असेल. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद राहणार आहेत. तसेच या महिन्यात बरेच सण असल्यामुळेदेखील बँक बंद राहणार आहेत.
बँकेच्या सुट्ट्यांची (Bank Holiday) संपूर्ण यादी खालीलप्रमाणे
1 जानेवरी 2023 – रविवार असल्याने संपूर्ण देशात बँका बंद राहतील
2 जानेवरी2023 – मिझोराम इथे नव्या वर्षाच्या सुट्टीनिमित्ताने बँक बंद
11 जानेवरी 2023 – मिशनरी दिवस मिझोराम इथल्या सर्व बँका बंद राहणार आहेत
12 जानेवरी 2023 – स्वामी विवेकानंद जयंती पश्चिम बंगालमधील बँकांना सुट्टी असणार आहे
14 जानेवरी 2023 – महिन्याचा दुसरा शनिवार संपूर्ण देशातील बँका बंद
15 जानेवरी 2023 – रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद
16 जानेवरी 2023 – पाँडिचेरी आणि तामिळनाडूमध्ये बँका बंद राहणार आहेत, तर आंध्र प्रदेशात कनुमा पांडुगाच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहेत.
22 जानेवरी 2023 – रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
23 जानेवरी 2023 – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी आसाममधील बँका बंद राहणार आहेत.
25 जानेवरी 2023 – राजत्त्व दिनामुळे हिमाचल प्रदेशातील बँका बंद राहणार आहेत.
26 जानेवरी 2023 – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात बँका बंद राहणार आहेत.
28 जानेवरी 2023 – महिन्याच्या चौथ्या शनिवारी बँका बंद राहणार आहेत.
29 जानेवरी 2023 – रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
31 जानेवरी 2023 – आसाममधील बँका मी-दम-मी-फायच्या दिवशी बंद राहणार आहेत.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय