हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात सगळीकडेच नवीन वर्षाचे स्वागत होताना दिसत आहे. जगभरातील लोक 2023 या वर्ष्याला आणि त्यासोबतच्या 2023 घडलेल्या घटनांना पाठी सोडून नवीन वर्षात पदार्पण करत आहेत. यासाठीच लोक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे संदेश एकमेकांना पाठवतात. आज नवीन वर्ष असल्याने सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? जगात असे ५ देश आहेत जे 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरं होत नाही. हे देश नेमके कोणते आहेत आणि 1 जानेवारीला नववर्ष साजरं न करण्याचा उद्देश काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
1) सौदी अरेबिया :
सौदी अरेबिया व युनाइटेड अरब अमीरात सारखे बहुतेक मुस्लिम देश आपले नवीन वर्ष इस्लामिक धर्मानुसार साजरे करतात. इस्लामिक नवीन वर्षाची तारीख किंवा रास अस-सनह अल-हिजरिया दरवर्षी बदलते. असे मानले जाते की या दिवशी प्रेषित मोहम्मद मक्का येथून मदिना येथे स्थलांतरित झाले. त्यामुळे या देशातील लोक 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करताना दिसणार नाहीत.
2) चीन :
चीन मधील नवीन वर्ष 1 जानेवारीला सुरु न होता जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान आलेल्या विशिष्ट दिवशी साजरे केले जाते. चीनमध्ये केवळ चंद्रावर आधारित कॅलेंडर मानले जाते. दर तीन वर्षांनी सूर्य-आधारित कॅलेंडरशी जुळले जाते.
3) थायलंड :
थायलंड मधील लोकांना नवीन वर्ष साजरे करण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागते. थाई लोक 13 किंवा 14 एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरे करतात . थाई भाषेत त्याला सॉन्गक्रान म्हणतात. या दिवशी लोक एकमेकांना थंड पाण्याने आंघोळ घालतात. आणि जुने वर्ष मागे सोडून नवीन वर्ष्याला सुरुवात करतात.
4) रशिया आणि युक्रेन :
रशिया आणि युक्रेन हे युरेशीयातील देश आपले नवीन वर्ष 14 जानेवारीला साजरे करतात. युरोपातील देशाचे शेजारी असून सुद्धा हे देश आपल्या परंपरेनुसार आपले नवीन वर्ष साजरा करताना दिसून येतात.
5) श्रीलंका :
श्रीलंकेत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला अलुथ म्हणतात. श्रीलंकेतील लोक आपले नवीन वर्ष एप्रिल महिन्यात साजरे करतात. नवीन वर्ष्याच्या सुरुवातीला श्रीलंकेतील लोक नैसर्गिक गोष्टी मिसळून अंघोळ करतात.