अंगावरची हळद उतरली नाही तोवर नववधू प्राजक्तावर काळाचा घाला; देतेय मृत्यूशी झुंज; हवाय तुमच्या मदतीचा एक हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच लग्न झालेलं, अंगावरची हळदही उतरलीही नव्हती. आपल्या जोडीदारासोबत नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नववधूवर अचानक काळाने घाला घातला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील असलेली प्राजक्ता खरात-दडस हि नववधू सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. फलटण मार्गे ती मुंबईतील विक्रोळी येथील सासरच्या घरी निघालेली असताना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला. तेव्हापासून प्राजक्ता बेशुद्ध अवस्थेत असून अपघातात सासू उज्वला दडस या जागीच ठार झाल्या आहेत. प्राजक्ताच्या मेंदूला मार लागला असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, उपचारासाठी दररोज किमान 2 लाख रुपये इतका खर्च जास्त लागणार असल्याने तिला मदतीची गरज असून मदत करण्याचे आवाहन कुटूंबियांनी केले आहे.

फलटण येथे बुधवारी (ता. 28 जून) प्राजक्ताचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला होता. पण अवघ्या पाचव्याच दिवशी (ता. 3 जुलै) सासरी येत असताना त्यांच्या गाडीचा पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. तेव्हापासून प्राजक्ता बेशुद्ध अवस्थेत आहे. प्राजक्ताच माण तालुक्यातील माहेर असून ती आपल्या सासरी फलटण येथून मुंबईतील विक्रोळी येथील सासरच्या घरी पहिले पाऊल टाकणार होती. नववधूच्या स्वागतासाठी आरतीचे ताट तयार करण्यात आले होते. पण त्या अगोदरच काळाने घाला घातला. फलटण येथे बुधवारी (ता. 28 जून) प्राजक्ताचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला होता. पण अवघ्या पाचव्याच दिवशी (ता. 3जुलै) तिचा भीषण अपघात झाला.

कामोठे येथील MGM रूग्णालयात तिच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते. येथील डॉक्टरांनी तातडीची वैद्यकीय सेवा देवून प्राजक्ताची प्राणज्योत तेवत ठेवली. बुधवारी पहाटे 4 वाजता तिला मुलुंड येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राजक्ताचे प्राण वाचावे म्हणून सासरचे व माहेरचे दोन्ही बाजूंचे कुटुंबिय देवाकडे प्रार्थना करीत आहेत. प्राजक्ता मृत्यूवर मात करून पुन्हा चांगली होईल असा विश्वास दोन्ही कुटुंबियांना आहे.

फोर्टिस रूग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. जयेश सरदाना यांनी बुधवारी सायंकाळी तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली आहे. प्राजक्ताची परिस्थिती नाजूक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. फोर्टिस रूग्णालयाची सेवा बरीच खर्चिक आहे. पण प्राजक्ताचा जीव वाचवायचा असेल तर ही महागडी सेवा स्विकारण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच खरात व दडस कुुंटुंबिय व नातलगांनी मिळून खर्चाचा भार पेलण्याचा निर्णय घेतला आहे. पण फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पहिल्याच दिवशी साधारण पावणे दोन लाख रूपये उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च झाले आहेत.

प्राजक्तावर शस्त्रक्रिया मात्र, अवस्था अजूनही नाजूकच…

भीषण अपघातात जखमी झालेल्या प्राजक्ता खरात-दडस हिला फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नुकतीच तिच्यावर डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही तिची प्रकृती नाजूक असल्याची माहिती प्राजक्ताचे वडील साहेबराव खरात यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

प्राजक्ताच्या मदतीसाठी Whats app ग्रुप तयार

प्राजक्ताच्या उपचारासाठीचा खर्च आणखी वाढत जाणार असल्यामुळे पुढील वैद्यकीय खर्चाला हातभार लागावा या हेतूने एक Whats app ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये खरात व दडस कुुटुंबांतील सदस्य, नातलग, हितचिंतक यांचा समावेश आहे. या शिवाय सरकारमधील वैद्यकीय सेवेशी संबंधित विविध अधिकारी यांनाही या ग्रुपमध्ये सामाविष्ठ करण्यात आले आहे. प्राजक्ताचे आयुष्य पुर्व पदावर यावे आणि प्राजक्ताला या जीवघेण्या संघर्षातून बाहेर काढण्यासाठी विविध मार्गाने मदत करावी असे आवाहन तिच्या नातेवाईकांनी केले आहे.

‘या’ ठिकाणी करावी प्राजक्ताला मदत :
Account Name: Sahebrao Malhari Kharat
Account no:50100386492962
IFSC CODE:HDFC0000967
Mobile No :9821299247
Deepali Kharat: Gpay no:7710804750