Mumbai Local Mega Block| रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की, प्रवाशांच्या तोंडावर बारा वाजताच. या मेगाब्लॉकमुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. आता तर या प्रवाशांना पुढचे पंधरा दिवस या मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. कारण 17 मेपासून ते 1 जूनपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक राहणार असल्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. सध्या 24 डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील 10 आणि 11 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासह काही तांत्रिक कामेही करणे बाकी आहेत. या कारणांमुळेच 17 मेपासून ते 1 जूनपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात काही लांब पडल्याच्या पल्ल्याच्या गाड्या पनवेल, दादर स्थानकांपर्यंत धावतील. (Mumbai Local Mega Block) यामुळे लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक गैरसोयीचा सामना करावा लागेल.
या मेगाब्लॉकचा उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर ही मोठा परिणाम होणार आहे. (Mumbai Local Mega Block) या काळात CSMT हून 12.14 वाजचा कसारासाठीची शेवटची लोकल सोडली जाईल. तर कल्याण येथून रात्री 10 वाजून 34 मिनिटांनी CSMT साठी शेवटची लोकल असेल. तर पहाटे 4.47 वाजता CSMT हून कर्जतला जाण्यासाठी पहिली लोकल असेल. तर ठाण्यामधून पहाटे चार वाजता CSMT साठी पाहिली लोकल सुटेल. या मेगा ब्लॉकच्या काळामध्ये भायखळा ते CSMT दरम्यान लोकल धावणार नाही. (Mumbai Local Mega Block)