जा आणि आपल्या स्वप्नांना साध्य करा; निक्की तंबोलीचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

0
48
Nikki Tamboli
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १४ फेम निक्की तंबोलीचा भाऊ जतिन तंबोली याचे नुकतेच काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. दरम्यान निक्की आपल्या भावाला गमावल्यानंतर अत्यंत दुखी होती. याबाबत तिनेच इंस्टाग्रामवर भावुक होत पोस्ट केली होती. मात्र शो मस्ट गो व म्हणत निक्कीने आता पुढील आयुष्याशी सुरुवात केली आहे. निक्की खतरों के खिलाडी या आव्हानात्मक रिऍलिटी शोच्या आगामी सिजनसाठी स्पर्धक म्हणून निवडली गेली आहे. इतकेच नव्हे तर या शोसाठी ती केपटाऊनला रवाना झाली आहे. मात्र तिचा हा प्रवास नेटकऱ्यांना काहीसा रुचलेला नाही. अनेकांनी तिला भावाच्या निधनानंतर मजा कसली करतेयस? असे बोचणारे प्रश्न करीत तिच्या वैयक्तिक आयुष्यावर बोट उचलले आहे. मात्र ऐकून सहन करेल ती निक्की थोडीच.. निक्कीनेही या ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.

https://www.instagram.com/p/COnd5H4LbIy/?utm_source=ig_web_copy_link

निक्कीने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, काही मूर्ख लोक मला मेसेज करीत आहेत आणि माझ्या फोटोंवर कमेंट करीत आहेत, की काही दिवसांपूर्वी तुझा भाऊ निधन पावला आहे, तुला लाज वाटत नाही तू मजा करतेयस. म्हणून अश्या मूर्खांना मी सांगू इच्छिते की माझेही वैयक्तिक जीवन आहे, मी पूर्णपणे आनंदी राहण्यासाठी पात्र आहे.

https://www.instagram.com/p/COhhy1dnFPL/?utm_source=ig_web_copy_link

स्वतःसाठीच नव्हे तर माझ्या भावासाठी सुद्धा कारण मी आनंदी असलेले त्याला फार आवडते आणि या लोकांना ज्यांना काम नाही परंतु केवळ टिप्पणी देण्यास व नकारात्मकतेचा प्रसार करण्यास वेळ आहे त्यांनी माझी विनंती आहे कि, जा आणि आपल्या स्वप्नांना साध्य करा. जे आपल्याला आणि आपले पालक आणि आपल्या प्रियजनांना देखील आनंदित करेल. या पोस्टवर अभिनेत्री रश्मी देसाईने देखील निक्कीला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

https://www.instagram.com/p/CMYlOxnn-PV/?utm_source=ig_web_copy_link

नुकतेच निक्की खतरों के खिलाडीच्या आगामी सिजनसाठी स्पर्धक म्हणून दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी निक्की लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस सीजन १४ मध्ये दिसली होती. तिचा बोल्ड लूक, हटके आणि बेधडक जगण्याचा अंदाज प्रेक्षकांचा प्रचंड भावला होता. कोणत्याही गोष्टीसाठी तयार असलेली निक्की सर्वानाच चांगली भावली. तिचा हाच बेधडक अंदाज आणि जिगरा पाहून तिची निवड खतरों के खिलाडी सीजन ११ साठी स्पर्धक म्हणून झाली आहे. आता हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे आहे कि ढायढाय करून घायाळ करणारी निक्की आव्हानांना सामोरे जाते घाबरून घरी परतते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here