कॉमेडीचा डोस देण्यासाठी निलेश साबळे आणि भाऊ कदम पुन्हा सज्ज, ‘या’ शोची केली घोषणा

0
1
Nilesh Sabale And Bhau Kadam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

‘चला हवा येऊ द्या हा टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय शो होता. या शोने गेले दहा वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच 17 मार्च रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड पार पडला. आणि या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु हा शो बंद होण्याआधीच डॉक्टर निलेश साबळे यांनी हा सोडला होता. शोमधील त्याच्या एक्झिटनंतर त्याच्या अनेक त्यांच्या चाहत्यांना खूप वाईट वाटले होते. या शोमध्ये तो अनेक जबाबदाऱ्या एकदा सांभाळत होता. लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन त्याचप्रमाणे तो अभिनय देखील करायचा. त्यामुळे तो या शोमधून बाहेर पडल्यावर त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले होते. परंतु एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता निलेश साबळे पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर त्याचा मनोरंजनाचा खजिना घेऊन परतणार आहे. निलेश साबळेसोबत भाऊ कदम आणि ओमकार भोजने हे कलाकार देखील या कार्यक्रमात असणार आहे. या कार्यक्रमाचे नाव ‘हसताय ना… हसायलाच पाहिजे’ असे ठेवण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाचे लेखन, सूत्रसंचालन, दिग्दर्शन या सगळ्याची जबाबदारी निलेश साबळे साकारणार आहे. त्याचप्रमाणे भाऊ कदम, ओमकार भोजने, सुपर्णा श्याम स्नेहल शिदम, रोहित चव्हाण यांसारखे कलाकार देखील यामध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे भरत जाधव, अलका कुबल यांसारखे सेलिब्रेटी या कार्यक्रमात आपल्याला पाहुणे म्हणून पाहायला मिळणार आहेत .

चला हवा येऊ द्या या शोमधून निलेश साबळेने घराघरात त्याचे एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. संपूर्ण जगभरात त्याचा चाहता वर्ग आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये देखील त्याचे अनेक फॅन्स पाहायला मिळतात. निलेश साबळे यांनी टेलिव्हिजनवरून सुट्टी घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता तो पुन्हा एकदा त्याच्या नव्या शैलीमध्ये प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झालेला आहे. त्याचा हा हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो कलर्स मराठीवर आपल्याला पाहता येणार आहे. येत्या 20 एप्रिलपासून शनिवार ते रविवार रात्री 9 वाजता आपल्याला हा शो पाहायला मिळणार आहे.