कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या 50 व्या महापौरपदी नगरसेविका निलोफर आश्कीन आजरेकर यांची आज निवड झाली. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
महापौरपदासाठी नगरसेविका निलोफर आजरेकर व अर्चना पागर यांचे अर्ज दाखल आले होते. प्रारंभी पिठासीन अधिकारी यांनी सदरच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही. यानंतर महापौरपदासाठी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये सौ.निलोफर आजरेकर यांना 48 मते तर अर्चना पागर यांना 1 मते पडली. निलोफर आजरेकर यांना सर्वाधिक 48 मते पडल्याने त्यांची महापौरपदी निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी घोषित केले.
नुतन महापौर निलोफर अशकिन आजरेकर हया प्रभाग क्र.26 कॉमर्स कॉलेज या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. या निवडीवेळी भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवक/नगरसेविका गैरहजर होत्या. ताराराणी आघाडीचे एकमेव सदस्य कमलाकर भोपळे हे उपस्थित होते. यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, अधिकारी, नगरसेवक/ नगरसेविका यांनी नुतन महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.