निर्भया अजूनही न्यायाच्या उबंरठ्यावरचं; दोषींच्या फाशीला पुन्हा स्थगिती

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पटियाला हाऊस कोर्टाने उद्या निर्भया सामूहिक बलात्कार खून प्रकरणातील सर्व दोषींच्या फाशीवर स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोर्टाने सर्व दोषींच्या फाशीला स्थगिती दिली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने फाशी पुढे ढकलली कारण चार दोषींपैकी पवन नावाची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. कोर्टाने म्हटले आहे की, आरोपी पवन कुमार गुप्ताची दया याचिका प्रलंबित असताना अशा परिस्थितीत त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. दोषींच्या फाशीला स्थागिती देण्याची ही तिसरी वेळ असून पहिल्यांदा फाशीची तारीख २२ जानेवारी निश्चित करण्यात आली होती. यानंतर, १ फेब्रुवारी रोजी फाशीची तारीख निश्चित केली गेली. परंतु, दोषींच्या वकिलाने कादेशीर डावपेच खेळून फाशी रद्द करण्यात यश मिळवले होते.

दोषींच्या फाशीला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर निर्भयाच्या आईने न्यायव्यस्थेवर हतबल होत नाराजी व्यक्त केली. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले कि, आजच्या कोर्टाच्या निर्णयातून न्याय यंत्रणेतील अपयश दिसून येते. त्या म्हणाल्या, ”न्यायालय दोषींना फाशी देण्याच्या स्वत: च्याच आदेशाचे पालन करण्यास इतका का वेळ घेत आहे? वारंवार दोषींच्या फाशीला थांबविणे सिस्टमचे अपयश दर्शवते. देशातील न्यायव्यवस्था संपूर्णपणे गुन्हेगारांना संरक्षण देत आहे.”

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here