निर्भया बलात्कार्‍यांची फाशी राजकिय फायद्यासाठीच रोखली, आशा देवींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | ज्या लोकांनी २०१२ साली रस्त्यावर उतरुन काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केले तेच लोक आता माझ्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण करत असल्याचा आरोप निर्भयाच्या आई आशा देवी यांनी केला आहे. माझ्या मुलीच्या मृत्यूचा खेळ होऊ देऊ नये असे म्हणत राजकिय फायद्यासाठीच निर्भया बलात्कार्‍यांची फाशी रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील निर्भयाच्या आईने मोदी सरकारवर केला आहे.

‘बहुत हुँआ नारी पर वार, अब की बार मोदी सरकार’ असा नारा देऊन दुसर्‍यांदा सत्तेत येणाऱ्या पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांना आशा देवी यांनी हात जोडून विनंती केली आहे. निर्भयाच्या बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा देऊन न्याय द्यावा अशी विनंती निर्भयाच्या आईने केली आहे.

एका मुलीच्या मृत्यूचा खेळ होऊ देऊ नका. निर्भयाच्या सर्व बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी निर्भयाच्या आईने आज केली. सात वर्षांपूर्वी मोदींनी बहुत हुँआ नारी पर वार अब की बार मोदी सरकार असा नारा दिला होता. आता या बलात्कार्‍यांना फाशी देऊन निर्भयाला न्याय मिळवून द्यावा. फाशि देऊन सरकारने दाखवून द्यावे की या देशात महिला सुरक्षित आहेत असे आवाहन निर्भयाच्या आईने केले आहे.