हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटानंतर आज पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
रेल्वेसाठी रेकॉर्ड 1.1 लाख कोटी दिले जाणार आहेत, यामध्ये मेक इन इंडियावर जास्त भर दिला जाईल,अशी घोषणा निर्मला सितारामन यांनी केली आहे. मेट्रो लाईट, मेट्रो नियो सर्व्हिस सुरु केली जाईल, सार्वजनिक बसेससाठी 18 हजार कोटी रुपये दिले जातील असेही त्या म्हणाल्या.
रेल्वेसाठी रेकॉर्ड 1.1 लाख कोटी दिले जाणार आहेत, यामध्ये मेक इन इंडियावर जास्त भर दिला जाईल, मेट्रो लाईट, मेट्रो नियो सर्व्हिस सुरु केली जाईल, सार्वजनिक बसेससाठी 18 हजार कोटी रुपये दिले जातील. जे रेल्वेमार्ग आहे, जिथं जास्त वर्दळ आहे, तिथं ऑटोमेॅटिक पद्धती बसवणार, ज्यासाठी 1 लाख 10 हजार कोटी रुपये ठेवले जातील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’