निर्मला सीतारामन यांनी घेतली सिंगापूर, कॅनडा, यूकेच्या अर्थमंत्र्यांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सिंगापूर, कॅनडा आणि ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांची भेट घेतली. आर्थिक, आरोग्य आणि सहकार्य वाढविण्यासह विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. सीतारामन 30-31 ऑक्टोबर रोजी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या आधी G20 वित्त आणि आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रोमला पोहोचल्या.

बैठकीच्या प्रसंगी, सीतारामन यांनी ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक, सिंगापूरचे अर्थमंत्री लॉरेन्स वोंग आणि कॅनडाचे अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांची भेट घेतली. अर्थ मंत्रालयाने ट्विट केले की, अर्थमंत्री सीतारामन यांनी क्रिस्टिया फ्रीलँडशी आर्थिक आणि आरोग्य सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

G20 रोम समिट
अर्थ मंत्रालयाने ट्विट केले की, “अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी G20 रोम शिखर परिषदेपूर्वी रोममध्ये G20 अर्थ आणि आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीच्या बाजूला सिंगापूरचे अर्थमंत्री लॉरेन्स वोंग यांची भेट घेतली. भारत-सिंगापूरमधील मजबूत संबंध लक्षात घेता, दोन्ही मंत्र्यांनी पुढील सहकार्याच्या संधींवर चर्चा केली.”

मंत्रालयाने सांगितले की,”सीतारामन यांनी ब्राझीलचे अर्थमंत्री पाउलो गुएडेस यांच्याशीही विविध मुद्द्यांवर चर्चा केली. सीतारामन यांनी ग्लोबल फंडचे कार्यकारी संचालक पीटर सँड्स यांचीही भेट घेतली आणि एड्स, क्षयरोग आणि मलेरियाशी लढण्यासाठी ग्लोबल फंडच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.”

नेदरलँडची राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली
सीतारामन यांनी नेदरलँडची राणी मॅक्सिमा यांचीही भेट घेतली, ज्यांनी वंचितांसाठी आर्थिक मदतीला प्राधान्य देण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सीतारामन यांनी G20 मंत्रिस्तरीय बैठकीत साथीच्या रोगाचा प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसाद यामधील दीर्घकालीन आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि जागतिक आरोग्य वित्तपुरवठा प्रणाली मजबूत करण्यासाठी भाग घेतला.

G20 हा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय गट आहे जो जगातील 19 प्रमुख अर्थव्यवस्था आणि युरोपियन युनियन यांना एकत्र आणतो. त्याचे सदस्य देश जागतिक जीडीपीमध्ये 80 टक्के आणि जागतिक व्यापारात 75 टक्के योगदान देतात. जगातील 60 टक्के लोकसंख्या या देशांमध्ये राहते.