नारायण राणेंना संपवण्यासाठीही अनेक सुपाऱ्या दिल्या होत्या; नितेश राणेंचा आरोप

0
111
narayan rane uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली नाही असा दावा बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केल्यांनतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न झाला होता असं नितेश राणे म्हणाले.

एकनाथ शिंदेजी यांच्याप्रमाणेच माझ्या वडिलांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी तथाकथित विवेकी आणि सभ्य पक्षप्रमुखाने अनेक “सुपारी” दिल्या गेल्या.. म्याऊ म्याऊ संपू दे.. मग आपण “वस्त्रहरण” सुरू करू असे ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राणेंच्या या आरोपावर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येत ते आता पाहावं लागेल.

दरम्यान, ठाकरे परिवार आणि राणे कुटुंबीय यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. राज्यात ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर हा वाद आणखी विकोपाला गेली होता. नितेश राणे यांनी यापूर्वी देखील आदित्य ठाकरेंना ,म्याव म्याव करत डिवचले होते. आता तर त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच मोठा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे- राणे वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here