Nitish Kumar : नितीशकुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर; बिहारमध्ये उलटा डाव फिरणार

Nitish Kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nitish Kumar । बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांची JDU आणि भाजप यांच्या युतीने मोठं यश मिळवलं आहे. भाजपचे ८९ तर नितीशकुमारांचे ८५ आमदार निवडून आलेत. विरोधकांचा पुरता बाजार उठला असून नितीशकुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार कि भाजप नितीशकुमार यांचा गेम करणार हाच मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री पदावरून नितीशकुमार आणि भाजप यांच्यात वाद होण्याची शक्यता असतानाच आता एमआयएमने नितीशकुमार यांना थेट पंतप्रधान पदाची ऑफर देत मोठा डाव टाकला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत फक्त ५ पाच जागा जिंकल्या असूनही सदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आहे. ओवैसी यांचा MIM बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचे आणि स्वतःचा मुख्यमंत्री बसवण्याचे स्वप्न बघत आहे. त्यासाठी त्यांनी एक नवीन समीकरण सुद्धा तयार केलं आहे. एमआयएमने आरजेडी आणि जेडीयूला एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. आमचा मुख्यमंत्री करा आम्ही नितीश कुमार याना २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देऊ असे आश्वासन एमआयएमने दिले आहे.

सरकार स्थापन करणे अजूनही शक्य Nitish Kumar

याबाबत एमआयएमने ट्विट करत म्हंटल, की सरकार स्थापन करणे अजूनही शक्य आहे. जर जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, एआयएमआयएम, सीपीआयएमएल आणि सीपीआयएम एकत्र आले तर सरकार स्थापन होऊ शकते.जेडीयूकडे ८५ जागा आहेत, तर आरजेडीकडे २५ जागा आहेत. काँग्रेस आणि एआयएमआयएमने अनुक्रमे ६ आणि ५ जागा जिंकल्या. सीपीआय-एमएल आणि सीपीआय-एमने प्रत्येकी ३ जागा जिंकल्या. त्यांच्या एकूण जागा १२४ आहेत, बिहारमध्ये बहुमतासाठी १२२ चा आकडा लागतो. त्यामुळे आपण सरकार बनवू शकतो असे एमआयएमने म्हंटल.

संभाव्य मंत्रिमंडळ कसे असेल याचीही माहिती एमआयएमने दिली आहे.त्यांनी म्हंटल कि एमआयएम कडे एक मुख्यमंत्री असेल, तर जेडीयूच्या कोट्यात दोन उपमुख्यमंत्री आणि २० मंत्री असू शकतात. आरजेडीला ६ मंत्री दिले जाऊ शकतात, तर काँग्रेसला दोन मंत्री मिळू शकतात. सीपीआय-एमएल आणि सीपीआयएमला प्रत्येकी एक मंत्रीपद मिळू शकते. महत्वाची बाब म्हणजे असं झाल्यास आम्ही २०२९ मध्ये नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ अशी घोषणा एमआयएमने केली आहे. आता नितीशकुमार काय निर्णय घेतात यावर बिहारच्या राजकारणाची दिशा ठरेल.