वीज कनेक्शनची प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कराड तालुक्यासह करवडी येथील प्रलंबित असलेल्या वीज कनेक्शनच्या कामासह विविध मागण्या मार्गी लावण्यासाठी वीज महावितरण कंपनीच्या ओगलेवाडी येथील कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी शेतकऱ्यांच्या सोबत जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी करवडी येथे मंजूर झालेले सबस्टेशनचे काम त्वरित चालू करावे तसेच आरफळ कॅनॉल वरील वीज कनेक्शन बंद करू नये यासह वीज कनेक्शनची प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावी, अशी निवेदन देत मागणी केली.

अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवेळी निवास थोरात यांनी अधिकाऱ्यांपुढे विजेअभावी शेतकऱ्याना येणाऱ्या अडचणींबाबत वस्तुस्थिती मांडली. तसेच करवडी येथे मंजूर झालेले सबस्टेशनचे काम त्वरित चालू व्हावे तसेच आरफळ कॅनॉल वरील वीज कनेक्शन बंद न करणे हे शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत याबाबत मागणीचे निवेदनही दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मांडलेल्या तक्रारी ऐकून सकारात्मक मार्ग काढून त्वरित निर्णय घेऊ असे सांगितले.

वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांशी पार पडलेल्या बैठकीस रामकृष्ण वेताळ, वडोली निळेश्वरचे ग्रामपंचायत सदस्य निलेश पवार,अभिराज वाघमारे, अशोक मंडले, बाजीराव पवार (संचालक) बजरंग पवार, राजेंद्र पाटील, हणमंत पवार, प्रकाश पवार, प्रकाश डुबल यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.