नवी दिल्ली । सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैन्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीनला कायमचा धडा शिकविण्याची मागणी जोर धरू लागली असून कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने चिनी उत्पादनावर बहिष्काराची मागणी केली आहे. यानुसार टेलिकॉम मंत्रालयाने BSNL, MTNL सह अन्य टेलिकॉम कंपन्यांना 4G अपग्रेडेशनसाठी चीनकडून उपकरणवर खरेदी बंद घातल्याचे सांगितल्याचे वृत्त होते. मात्र, टेलिकॉम कंपनीच्या सचिवांनी हे वृत्त फेटाळले असून चीन कंपन्याच्या उत्पादनावर कुठिलीही बंदी किंवा काम थांबविण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
BSNLच्या 4G अपग्रेडेशनचे जुने टेंडर रद्द करण्यात येणार आहेत. हे टेंडर रद्द झाल्यानंतर चीनच्या कंपन्या पुन्हा टेंडर प्रक्रियमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत, असे वृत्त माध्यमांत आले होते. मात्र, चीनी कंपन्यांसोबत काम करण्यास अथवा चीन उत्पादनाचा वापर करण्यास कुठलाही प्रतिबंध घालण्यात आला नाही. डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने देशातील कंपन्यांना, चीनी कंपन्यांसोबत पुढील करारांसंदर्भात विचार करण्याचं सूचवलं आहे. याशिवाय इतर कुठल्याही करारावर किंचतही परिणाम होणार नाही असं टेलिकॉम कंपनीचे सचिव अंशु प्रकाश यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, एकट्या टेलिकॉम साहित्याचा बाजार 12 हजार कोटींचा आहे. यामध्ये चीनच्या साहित्याचा वापर 25 टक्के आहे. चीनच्या उत्पादनांवर बंदी आणण्याचा निर्णय महागडा ठरणार असल्याचे या क्षेत्रातील लोकांनी सांगितले. जर भारतीय कंपन्या चीन सोडून दुसऱ्या देशांमधून ही उपकरणे आयात करत असतील तर त्याचा खर्च 15 टक्क्यांनी वाढणार आहे. मंगळवारी CAIT ने केंद्र सरकारकडे चीनी कंपन्यांना दिलेले टेंडर तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनने केलेली गुंतवणूक मागे देण्यासाठी नियम बनविण्याची मागणी केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”