हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दरवर्षी मुंबईमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जातो. मुंबईतील प्रत्येक ठिकाणी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यावेळी एका दांडिया कार्यक्रमात लावलेल्या पाटीमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका दांडिया कार्यक्रमाच्या बाहेर “पटेल समाजाशिवाय कोणाला प्रवेश नाही”थेट अशी पाटी लावण्यात आली आहे. ज्यातून राज्यातील मराठी आणि गुजराती वाद अद्यापही शांत झालेला नाही हे स्पष्ट होत आहे.
मध्यंतरीच मुंबईत एका गुजराती व्यक्तीने मराठी माणसाला घर न दिल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच पेटले होते. यानंतर त्या गुजराती व्यक्तीने आपण केलेल्या कृत्याची जाहीर माफी मागितली होती. आता या सर्व घटनेला काही दिवस उलटून गेल्यानंतरच पुन्हा एकदा दांडिया कार्यक्रमात असाच एक प्रकार घडला आहे. मुंबईत पटेल समाजाशिवाय दांडिया कार्यक्रमांमध्ये तर कोणालाही प्रवेश नाही, थेट अशी पाटी लावण्यात आली होती. मात्र मनसेने यामध्ये हस्तक्षेप घेत कार्यक्रमाच्या आयोजकांना आपली चूक दाखवून दिली. त्यानंतर आयोजकांनी ही पाटी दुरुस्त करून पुन्हा लावली. तसेच घडलेल्या प्रकाराची माफी देखील मागितली.
दरम्यान, दांडिया कार्यक्रमाच्या बाहेर अशी पाटी लावल्यामुळे त्यावर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. हा सर्व प्रकार मनसेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी थेट कार्यक्रमाच्या आयोजकांची भेट घेतली. तसेच त्यांना त्यांच्याकडून झालेली चूक लक्षात आणून दिली. यानंतर आयोजकांनी पुन्हा ती पार्टी काढून, सर्वांना परवानगी आहे अशी पाटी लावली. त्याचबरोबर, आपल्याकडून झालेल्या चुकीची माफी देखील मागितली. ज्यामुळे निर्माण झालेला वाद शांत झाला.