नवी दिल्ली | वृत्तसंस्था
काही खत उत्पादक कंपन्यांनी दरवाढ केल्याच्या बातम्या विविध माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर केंद्र शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री मनसूख मंडाविया यांनी खत उत्पादक यांच्यासोबत सोबत बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ‘सध्याच्या स्थितीत कोणत्याही रासायनिक खताच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’.
का झाला होता दरवाढीचा गोंधळ
इफको चे विपणन संचालक योगेंद्र कुमार यांनी राज्यस्तरीय कार्यालय यांना पाठवलेल्या पत्रात डीएपीची 50 किलोची गोणी 1900 रुपयांना राहील असं म्हटलं होतं तसेच या पत्रात 20:20:0:13 या ग्रेड ची किंमत 1350 रुपये तर 15:15:15 या ग्रेडचा दर 1500रुपये ठेवण्यात आला होता. ” आमच्या प्रशासकीय कामकाजातील हे पत्र आहे या सुधारित दराचा शेतकरी वर्गासाठी उपलब्ध असलेल्या दराशी संबंध नाही” असा दावा इफको केला आहे.
इफकोच्या म्हणण्यानुसार खतांच्या प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये दरवाढीचा उल्लेख केला आहेत मात्र हे दर पुढील काही महिन्यांची स्थिती विचारात घेत गोदामांमध्ये साठवणुकीसाठी होणाऱ्या खतांच्या बाबतीतील आहेत. शेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या सध्याच्या खाताबाबत नव्या दराचा संबंध नाही. शेतकऱ्यांसाठी विक्रीकरिता उपलब्ध होणाऱ्या नव्या मालाचे दर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. जुना खत साठा बाजारात उपलब्ध असून तो जुन्या दरानेच विक्री करण्यात येईल ” अशी भूमिका इफकोने स्पष्ट केली आहे.
“11.26 लाख टन संयुक्त खते ही शेतकऱ्यांना जुन्या दराने दिली जाणार आहेत नवे दर शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेले नाहीत” असे मुख्यालयाने म्हटले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा