ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही; ड्रायव्हिंग टेस्टही ऑनलाईन होईल! हे आहेत नवीन नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी आणि त्याच्या रिन्यूअलसाठी नवीन मार्गदर्शक सूचना आणली आहे. यामध्ये लायसन्स मिळण्याबाबत अनेक महत्त्वापूर्ण बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार आता लर्निंग लायसन्स मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जाईल म्हणजेच आता अर्ज करण्यापासून ते लायसन्सच्या प्रिंटिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल. याव्यतिरिक्त मेडिकल सर्टिफिकेट, लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर आणि त्याच्या रिन्यूअलसाठी ई- सर्टिफिकेट आणि ई- डॉक्युमेंट्स वापरले जाऊ शकतात.

RC रिन्यूअलसाठीही सुविधा:
या मार्गदर्शक सूचना आणण्यामागील हेतू नवीन वाहन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया देखील सुलभ व्हावी हा आहे. आता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) रिन्यूअल 60 दिवसांच्या आधी देखील करता येईल. याशिवाय तात्पुरते रजिस्ट्रेशन करण्याची मुदतही 1 महिन्यापासून 6 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

यापुढे ड्रायव्हिंग टेस्टसाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही:
याबरोबरच मंत्रालयाने ‘लर्निंग लायसन्स’ प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. त्यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO मध्ये जाण्याची गरज भासणार नाही. हे काम आता ट्यूटोरियलच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन करता येईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या नियमांमुळे कोरोना साथीच्या काळात लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment