आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे

Home Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : सध्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये तेजी आहे. अनेक लोकांकडून नवीन घरे किंवा फ्लॅट खरेदी केले जात आहेत. त्यापैकी बहुतेक कुटुंबे ही मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय आहेत. अनेक लोकं घर घेण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. मात्र होम लोनसाठी आपल्या फिजिकल आणि डिजिटल अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. डिजिटल होम लोनमुळे ही प्रक्रिया आधीपेक्षा खूपच सोपी बनली आहे.

How Digitization of Mortgage Lending Will Save Huge Money for Lenders? - Growth Grasp

आता यासाठी आपल्याला बँकांचे उंबरठे झिझवण्याची काहीच गरज नाही. ही प्रक्रिया आता आणखी पारदर्शक देखील झाली आहे, ज्यामुळे अनावश्यक त्रास देखील टाळता येईल. तसेच जर आपण बँकेच्या शाखेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला तर काही वेळा कागदपत्रांमध्ये काही तफावत असण्याची शक्यता असते, ज्यामुळे पुन्हा पुन्हा तेथे जावे लागू शकते. मात्र, डिजिटल होम लोनमध्ये असे होण्याची शक्यता खूपच कमी असते. चला तर मग आज आपण डिजिटल होम लोनचे फायदे जाणून घेउयात …

Enjoy the Benefits of going with Online Home Loan & Get Instant Digital Sanction Letter- The New Indian Express

स्वस्त कर्ज निवडण्याचा पर्याय

डिजिटल पद्धतीने आपल्याला विविध वित्तीय संस्थांद्वारे Home Loan ची ऑनलाइन तुलना करता येते. तसेच या आधारे आपल्याला स्वस्त होम लोन निवडता येईल. यासोबतच कर्जाची माहिती मिळवण्यासाठी किंवा त्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची देखील गरज भासत नाही. यासाठी बँकेच्या वेबसाइट किंवा ऍपद्वारे कर्जासाठी अर्ज करता येईल.

MONEY CLINIC | Can I cancel a home loan without incurring penalties? | Business

कागदोपत्रांपासून सुटका

बँकेतून कर्ज घेतानाची सर्वात मोठी अडचण म्हणजे यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे जमा करावी लागतात. तसेच यासाठी वेळही लागेल. मात्र, डिजिटल Home Loan मध्ये, आपली कागदपत्रे डिजिटल पद्धतीने अपलोड करता येतात. ही प्रक्रिया घरबसल्या अगदी आरामात पूर्ण करता येते. ज्यामुळे आपला बँकेत येण्या-जाण्याचा खर्च आणि वेळही वाचतो. तसेच याद्वारे बँका 24 तासांच्या आत डिजिटल लोन मंजूर करतात.

Home loan vs personal funds: How to choose when buying a home

फ्लेक्सिबल रीपेमेंट

डिजिटल Home Loan घेतल्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी लवचिकता मिळते. उदाहरणार्थ, कर्जाच्या परतफेडीदरम्यान आपली आर्थिक परिस्थिती बदलल्यास एखाद्या कार्यकारी व्यक्तीच्या मदतीने अटी आणि नियमांमध्ये बदल करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/personal-banking/loans/home-loan/instant-home-loan

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरांनी पकडला वेग, आजचे नवीन दर तपासा
Stock Tips : बाजारातील तेजीच्या दरम्यान ‘हे’ 5 स्टॉक्स अल्पावधीत देऊ शकतात मोठा नफा
EPFO पोर्टलवर घरबसल्या अशा प्रकारे तपासा आपल्या पेन्शनचे स्टेट्स
‘या’ बँका Personal Loan वर देत आहेत आकर्षक व्याजदर
PIB Factcheck : केंद्र सरकार सर्व आधार कार्डधारकांना देणार 80,000 रुपये, जाणून घ्या या मेसेजमागील सत्यता