केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन… अद्याप बुलेट ट्रेनचे काम बाकी असून प्रत्यक्षात ही ट्रेन सुरु होण्यासाठी वेळ लागेल. बुलेट ट्रेनसाठी 2030 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. मात्र आता वाट पाहण्याची गरज नाही! कारण पश्चिम रेल्वेने एक आनंददायक गिफ्ट दिलं आहे. मुंबई ते गुजरातमधील राजकोट दरम्यान सुपरफास्ट तेजस स्पेशल ट्रेन सुरू झाली आहे. बुलेट ट्रेन आधीच आता प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन आधीच मुंबई अहमदाबादचा प्रवास सुरु होणार आहे.
वेळापत्रक आणि तपशील
ट्रेन क्र. 09005
- मार्ग: मुंबई सेंट्रल → राजकोट
- प्रस्थान: सोमवार, बुधवार, शुक्रवार – रात्री 11:20
- पोहोच: दुसऱ्या दिवशी सकाळी 11:45
- सेवा कालावधी: 21 एप्रिल ते 28 मे
- फेऱ्या: एकूण 34
ट्रेन क्र. 09006
- मार्ग: राजकोट → मुंबई सेंट्रल
- प्रस्थान: मंगळवार, गुरुवार, शनिवार – संध्याकाळी 6:30
- पोहोच: दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30
- सेवा कालावधी: 22 एप्रिल ते 29 मे
थांबे (अप आणि डाउन मार्गावर)
ही ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर, वांकानेर या स्थानकांवर थांबे घेणार आहे.
सुविधा
- फर्स्ट एसी
- एसी-2 टायर
- एसी-3 टायर
ही तेजस स्पेशल ट्रेन विशेषतः उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन सुरू करण्यात आली असून, या मार्गावरील प्रवाशांसाठी ही एक मोठी सौगात ठरू शकते. आराम, वेळेची बचत आणि दर्जेदार सेवा यांचा अनुभव घेण्यासाठी या ट्रेनने प्रवास करून पहा.