सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
लोकांच्या भावना भडकवून हिंसाचाराच्या घटना घडतील अशा प्रकारचे भडकावू मेसेज कोणीही प्रसार माध्यमांवर प्रसारीत (Viral) करणार नाहीत. तसेच अग्नीपथ योजनेच्या विरोधात भडकावू मेसेज / संदेश, भाष्य करून हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे व्यक्ती, ग्रुप अॅडमीन व युवकांचेवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात येतील. तरी सर्व नागरीकांनी अग्नीपथ योजनेच्या विरोधात प्रसार माध्यमांवर कोणत्याही कोणत्याही प्रकारचे भडकावू मेसेज / संदेश, भाष्य प्रसारीत ( Viral ) करु नये, असे आवाहन सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केले आहे.
अग्निपथ योजनेबाबत पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनीही आवाहन केले आहे. श्री. निंबाळकर म्हणाले, भारतीय सैन्य दलामध्ये युवकांना भरतीसाठी अग्नीपथ योजना केंद्र शासनाकडून सुरु करण्यात आलेली असून या योजनेला देशातील काही राज्यामधून विरोध दर्शविला जात असून काही ठिकाणी हिंसाचाराचे प्रकार घडत आहेत. याच अनुुशंगाने सातारा जिल्हयामध्ये अग्नीपथ योजने विरोधात (दुर ऑफ डयुटी) आंदोलन/ मोर्चाचे नियोजन करण्यासाठी सोमवार दि. 20/06/2022 रोजी समन्वय बैठक आयोजित केले असल्याबाबचे संदेश प्रसार माध्यमांवर प्रसारीत केले जात आहेत.
सातारा जिल्हयातील सर्व नागरीक, सैन्य दलामध्ये भरती होण्याकरीता तयारी करीत असलेले युवक, करिअर अॅकॅडमीचे मालक / चालक यांना कळविण्यात येते की, प्रसार माध्यमांवर प्रसारीत होत असलेल्या मेसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये व तो मेसेज पुढे पाठवून (Forword ) करु नये.
मोर्चा काढू नये, अन्यथा गुन्हे दाखल होणार : भगवान निंबाळकर
आम्ही कडक ॲक्शन घेणार आहोत. यामध्ये स्वतः एसपी, 9 पोलीस उपअधीक्षक, 15 पोलीस निरीक्षक, 50 पीएसआय आणि सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह 3 हजाराचा पोलीस फोर्स आज रात्री पासूनच बंदोबस्तासाठी लावण्यात आलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी जमाव दिसेल, त्या त्या ठिकाणाहून आम्ही त्यांना उचलून गाडीमध्ये घालून अटक करणार आहोत. गुन्हे दाखल करणार आहे आणि कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये फिरकू नये आणि मोर्चा काढू नये, असे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी आवाहन केले आहे.