स्फोटच्या मदतीने Twin Tower पाडले!! पहा चित्तथरारक Video

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर नोएडातील सुपरटेकचा ट्विन टॉवर पाडण्यात आला आहे. आज दुपारी 2:30 वाजता एक ब्लास्ट घडवून 102 मीटर ऊंच अशी ही गगनचुंबी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. र 3,700 किलो स्फोटकांनी नोएडा सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने एपेक्स आणि सेयान हे दोन ट्विन टॉवर पाडण्यास परवानगी दिल्यानंतर पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांनी हा टॉवर पाडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. आज दुपारी 2.30 वाजता हा टॉवर पाडण्यात आला.  अवघ्या 9 सेकंदात ही इमारत जमीनदोस्त झाली. या ब्लास्टमुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज पसरले असून त्यावर मात करण्यासाठी पाण्याचा फवारा मारला जात आहे.

सुपरटेकचे ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी सुमारे 17.55 कोटी रुपये खर्च झाले. तो पाडण्याचा खर्चही बिल्डर कंपनी सुपरटेकने उचलला आहे. दोन्ही टॉवरमध्ये एकूण 950 फ्लॅट बांधण्यात आले होते. सुपरटेकने 200 ते 300 कोटी रुपये खर्चून हे ट्विन टॉवर बांधले.

इमारत पाडण्याचे नेमकं कारण काय??

नोएडातील सेक्टर 93 मध्ये सुपरटेक बिल्डर्स या खासगी बांधकाम व्यवसायिकाने दोन 32 मजली इमारती बांधल्या आहेत. ॲपेक्स आणि सेयान असं या इमारतींचं नाव आहे. मात्र इमारती बांधताना भुखंडाच्या तसेच बांधकामाच्या नियमांना पायदळी तुडवण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. तसेच मानकानुसार दोन्ही टॉवरच्या दरम्यान 16 फुटाचं अंतर असलं पाहिजे होतं. मात्र, ही मानके धाब्यावर बसून टॉवरमध्ये केवळ 9 मीटरचं अंतर ठेवलं गेलं. या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2021 मध्ये टॉवर पाडण्याचे आदेश दिले.