Northeast Election Results 2023 : जलद अपडेटसाठी Dailyhunt पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईशान्य भारतातील 3 महत्त्वाची राज्ये असलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. यातील नागालँड आणि त्रिपुरा येथे 27 फेब्रुवारीला मतदान पार पडले तर मेघालयला यापूर्वी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या तिन्ही राज्यातील निवडणुकांचे निकाल 2 मार्चला म्हणजेच गुरुवारी जाहीर होणार आहेत. या निवडणुक निकालासंबंधीत सर्वात जलद अपडेट पाहण्यासाठी भारतातील नंबर 1 स्थानिक भाषा कन्टेन्ट प्लॅटफॉर्म असलेल्या Dailyhunt सोबत जोडले जा. डेलिहंटवर तुम्हाला सखोल आणि रोमांचक कव्हरेज मिळेल. तत्पूर्वी आपण जाणून घेऊया या सर्व तिन्ही राज्यातील राजकीय परिस्थिती आणि कोणत्या पक्षाचा सामना कोणाशी आहे याबाबत….

त्रिपुरा-

त्रिपुरा मध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा असून बहुमतासाठी 31 जागांचा आकडा पार करायचा आहे. 2018 च्या निवडणुकीत भाजप आणि IPFT युतीने आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा पराभव करून सत्ता काबीज केली होती. त्यावेळी भाजपला 35 आणि IPFT ला 8 जागा मिळाल्या होत्या. आत्ताही भाजपसाठी अनुकूल परिस्थिती वाटत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि डाव्यांनी 2018 प्रमाणेच एकत्रित निवडणूक लढवली आहे. या दोघांना भाजपसह TMC चे सुद्धा आव्हान असेल. त्रिपुरामध्ये आदिवासी मते निर्णायक मानली जात असून ‘ग्रेटर टिपरालँड’च्या मागणीने भाजप, काँग्रेस आणि डाव्यांसाठी टिपरा मोथा हे मोठे आव्हान बनले आहे.

नागालँड-

नागालँड येथेही विधानसभेच्या 60 जागा आहेत आणि बहुमतासाठी 31 जागांचे संख्याबळ आवश्यक आहे. नागालँडचे मुख्यमंत्री नीफियू रिओ यांच्या सत्ताधारी आघाडीची युनायटेड डेमोक्रॅटिक अलायन्स राज्यात मजबूत मानली जात आहे. 2018 मध्ये, नागा पीपल्स फ्रंट (NPF) 27 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र त्यावेळी भाजपने NDPP , जनता दल (युनायटेड) यांच्याशी युती करून सरकार स्थापन केले. 2021 मध्ये NPF देखील सत्ताधारी आघाडीत सामील झाले होते, परंतु गेल्या वर्षी त्यांचे 21 आमदार NDPP मध्ये सामील झाल्यामुळे आता त्यांच्यासमोर आव्हान उभं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 60 पैकी 20 जागा लढवल्या आहेत तर 40 जागांवर NDPP उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.

मेघालय-

मेघालय मध्ये यंदा काटे कि टक्कर पाहायला मिळू शकते. 2018 च्या निवडणुकीनंतर NPP-नेतृत्वाखालील मेघालय लोकशाही आघाडीने (MDA) भाजप, UDP आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी NPP ने 19 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसने 21 जागा तर भाजपला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. यावर्षीच्या निवडणुकीत भाजप आणि एनपीपी स्वतंत्र निवडणूक लढले आहेत. तृणमूल काँग्रेसची ताकद मेघालय मध्ये वाढल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. विद्यमान मुख्यमंत्री आणि NPP प्रमुख कॉनरॅड संगमा आणि माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासाठी मेघालय विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

Dailyhunt वर पहा सर्वात जलद निवडणूक निकाल

डेलीहंट या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे लाईव्ह कव्हरेज देत आहे. निवडणुका केवळ आकड्यांवर नसतात, असे आमचे मत आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निकाला पर्यंत पोहोचण्यासाठी डेटा, नमुने आणि विश्लेषणाचा अर्थ लावण्यावर आमचे लक्ष आहे. आम्ही सर्व कानाकोपऱ्यातून विश्लेषण करू आणि डेटा आणि त्याचा अर्थ काय आहे याचा सखोल अभ्यास आपल्यापुढे सादर करू. या निवडणूक निकालाचे विश्लेषण अशा प्रकारे सादर केले जाईल की ते सर्वसामान्य व्यक्तींपासून ते राजकीय तज्ञापर्यंत अत्यंत सोप्या पद्धतीने समजू शकेल. डेलीहंटच्या कव्हरेज मध्ये तुम्हाला खालील गोष्टींचा समावेश असेल.

1) एका चांगल्या मांडणीच्या स्वरूपात निकालांचे लाइव्ह अपडेट
2) सध्याच्या निवडणुकीतील आकडेवारी आणि त्याची मागील निकालांशी तुलना
3) राज्यवार आणि मतदारसंघनिहाय जागांच्या निकालाचे अपडेट
4) सोशल मीडियावरील प्रतिक्रिया तसेच ट्विटरवरील ट्रेंडिंग स्टोरीज
5) याशिवाय थेट व्हिडिओ, व्हायरल मिम्स, ट्रेंडिंग स्टोरीज, व्हिडिओ असा सर्वसमावेशक गोष्टी डेलिहंटच्या कव्हरेज मधून मिळतील.