CAA ला विरोधच पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार नाही;बसपाच्या अध्यक्षा मायावती यांचे ट्विट  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्याला आम्ही नेहमीच विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलनही केलं आहे. मात्र आम्ही इतरांसारखे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि हिंसाचार करणार नाही. असं मत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी ट्विटवारे व्यक्त केले आहे.

दरम्यान केंद्र शासनाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी, नागरिक एकवटले आहेत. या विधेयकास विरोध करणाऱ्या जामिया इस्लामिया विद्यापीठात दिल्ली पोलिसांनी बेकायदा घुसखोरी करून विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला व अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्याशिवाय गोळीबारही करण्यात आला. या अत्याचाराचे पडसाद देशभरातील विद्यापीठांमध्ये उमटले आहेत.

या विधेयकाविरोधात नागरिक रस्त्यांवर उतरून निदर्शने करत आहेत. तसेच दिल्लीसह ईशान्येकडूही राज्यांमध्ये मोठा हिंसाचार होत आहे. हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचा आरोप करत कायदा मागे घेण्याची मागणी होत आहे. परंतु सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे नागरिकता सुधारणा विधेयकावर नेमका काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

Leave a Comment