पुण्यात हल्लेखोरांच्या गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी भरदुपारी झालेल्या गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. आज घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहराला हादरवून सोडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोथरुड येथील सुतारदरा भागात आज दुपारी काही अज्ञात हल्लेखोरांनी येऊन शरद मोहोळ याच्यावर लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच शरद मोहोळचा मृत्यु झाला.

सध्या पोलीस या सर्व घटनेचा कसून तपास करीत आहेत. तसेच हल्लेखोर नेमके कोण होते त्यांनी शरद मोहोळ याला मारण्याचा डाव कसा आखला याचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे पुण्यात एकच उडाली आहे. तसेच पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. अद्याप या हल्ल्याविषयी कोणतीही माहिती समोर आली नसली तरी गॅंगवॉर प्रकरणातून शरद मोहोळ यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला पुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या भागातून हल्ला गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे विद्येचे माहेरघर असणारे पुणे गुन्हेगारीचा चौक झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता दिवसाढवळ्या शरद मोहोळ याची हत्या करण्यात आल्यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.