नवी दिल्ली । सध्या LPG सिलेंडरचे बुकिंग वेगाने होत आहे. डिजिटल युगात असे अनेक पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या आरामात फक्त एका बटणावर क्लिक करून गॅस सिलेंडर बुक करू शकता. विशेष म्हणजे, इंडेन गॅस, एचपी गॅस आणि भारत गॅस या सर्वांच्या स्वतःच्या ऑनलाइन LPG बुकिंग सर्व्हिस आहेत, ज्यामुळे ग्राहकांना गॅस डीलरशीपला कॉल करण्याचा किंवा भेट देण्याच्या त्रासाशिवाय LPG सिलेंडर रिफिल बुक करता येते.
तुम्ही तुमचा LPG गॅस सिलेंडर IPPB मोबाईल बँकिंग अॅपद्वारे देखील बुक करू शकता. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने ट्विट केले, “IPPB त्यांच्या मोबाइल बँकिंग अॅपवरून LPG गॅस सिलेंडरचे ऑनलाइन बुकिंग सुलभ आणि सुरक्षित करते.”
@IPPBOnline makes booking of LPG gas cylinder easy and secure with its Mobile Banking app.
To view video on how to book LPG cylinder using IPPB Mobile Banking App click – https://t.co/OGXQvTXnzL
To download IPPB mobile Banking App and for more information (1/3) pic.twitter.com/ucNEpYqoYD— India Post Payments Bank (@IPPBOnline) December 8, 2021
हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे
IPPB ने आपल्या ट्विटसह एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये अॅपद्वारे ऑनलाइन करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस स्पष्ट केली आहे.
बुकिंगसाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा
गॅस सिलेंडर बुक करण्याचा सोपा मार्ग शोधत आहात? काळजी करू नका आणि IPPBOnline मोबाइल बँकिंग अॅप वापरून या सोप्या स्टेप्स फॉलो करा.. हा मार्ग आहे…
– IPPB मोबाइल बँकिंग अॅप डाउनलोड करा.
– लॉग इन करा आणि पे बिल वर क्लिक करा, LPG सिलेंडर निवडा.
– तुमचा बिलर निवडा, ग्राहक/वितरक/LPG आयडी आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर एंटर करा.
– Get Bill वर क्लिक करा, पेमेंट पद्धत निवडा. पेमेंट, कन्फर्म आणि पे वर क्लिक करा आणि मिळालेला OTP एंटर करा.
– तुमची LPG सिलेंडर बुकिंग यशस्वी झाली आहे आणि तुम्हाला एक कंफर्मेशन SMS मिळेल.
– इतर चॅनेलद्वारे केलेल्या बुकिंगसाठी, अॅपमधील स्कॅन आणि पेमेंट पर्याय वापरून पेमेंट केले जाऊ शकते.