आता मुलीच्या लग्नाचे टेन्शन घेऊ नका; ‘इथे’ गुंतवणूक करून मिळवा 65 लाख रुपये

Kisan Vikas Patra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । तुमच्याही घरात जर लहान मुलगी असेल तर तिच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैशांची गरज आता सहज भागवता येईल. यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करावी लागेल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी खाते उघडता येते. यामध्ये तुमच्या मुलीसाठी तुम्ही दिवसाला 100 रुपये वाचवून 15 लाख रुपये आणि 416 रुपये वाचवून 65 लाख रुपये जमवू शकता, जे तिच्या चांगल्या भविष्यासाठी उपयोगी ठरेल.

जाणून घ्या काय आहे सुकन्या समृद्धी योजना?
सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही केंद्र सरकारची मुलींसाठी असलेली लहान बचत योजना आहे. जी बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. सुकन्या ही लघु बचत योजनेतील सर्वोत्तम व्याजदर देणारी योजना आहे.

खाते कसे उघडायचे?
या योजनेत कोणतीही व्यक्ती आपल्या दोन मुलींसाठी खाते उघडू शकते. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते 10 वर्षे वयाच्या आधी मुलीच्या जन्मानंतर 250 रुपयांच्या डिपॉझिट्सह उघडले जाऊ शकते.

खाते कुठे उघडणार?
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शिअल बँकेच्या अधिकृत शाखेत उघडता येते. वयाच्या 21 व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात.

तुम्ही किती गुंतवणूक करू शकता?
चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. सध्या त्यावर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत 9 वर्षे 4 महिन्यांत रक्कम दुप्पट होईल.

65 लाख रुपये कसे मिळवायचे समजून घ्या
>> तुम्ही या योजनेत दरमहा रु. 3000 म्हणजेच वार्षिक रु. 36000 ची गुंतवणूक केल्यास, 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने तुम्हाला 14 वर्षांनी 9,11,574 रुपये मिळतील.
>> 21 वर्षे म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये असेल. म्हणजेच, जर तुम्ही दररोज 100 रुपये वाचवून ते जमा केले तर तुम्ही मुलीसाठी 15 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता.
>> त्याच वेळी, दररोज 416 रुपयांपर्यंत बचत करून, तुम्ही 65 लाख रुपये जोडू शकता.

हे खाते किती दिवस चालू राहणार?
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यानंतर, मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत ते सुरू ठेवता येते.