हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp, जगातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मेसेंजिंग अँप्स पैकी एक आहे. Whatsapp शिवाय राहणारी मंडळी सहजासहजी शोधून सापडणार नाहीत. कारण तो आजच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. जर व्हॉट्सअप वरील जुने डिलीट केलेले मॅसेज आपल्याला पुन्हा वाचायचे असतील तर काही खास प्रोसेसर, ऍप्लिकेशन्स आहेत. कि त्याद्वारे आपण सहजरीतीने मॅसेज वाचू शकता.
व्हॉट्सअॅपमध्ये सध्या डिलीट केलेले मॅसेज वाचण्यासाठी कोणतेही इन-बिल्ट फीचर नाही. त्यासाठी WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचायचे असल्यास काही अप घ्यावे लागतात. त्यासाठी WhatisRemoved+, Notisave आणि WAMR सारख्या थर्ड-पार्टी अॅप्लिकेशन्सद्वारे आपण जुने मॅसेज पाहू शकता.
हे थर्ड-पार्टी अॅप्स आपल्या मोबाईलमधील Google Play Store वरून डाउनलोड करावे लागतात. हे अॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर अॅपच्या अटी आणि शर्ती दिल्या जातात.त्या मान्य केल्यानंतर फोनवरील सूचना, मीडिया आणि फाइल्स वाचण्यासाठी आवश्यक प्रवेश अॅक्सेस द्यावा लागेल.
हि अॅप्लिकेशन्स एकदा आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यास तसेच ती इन्स्टॉल त्याच्या माध्यमातून जेव्हा कोणी तुम्हाला मेसेज पाठवेल आणि तो डिलीट करेल, तेव्हा हे अॅप त्या सूचना सेव्ह करेल. येथून डिलीट केलेले मेसेज सहज वाचू शकता येतील.
डिलीट झालेलया मॅसेजला असे करा रिस्टोर
आपल्या WhatsApp वरील जे मॅसेज डिलीट झाले आहेत. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप अकाउंटच्या चॅट बॅकअप ऑप्शन डेलीवर सेट करणे आवश्यक आहे. याला रिस्टोर करणे सोपे जाईल. कारण, नियमितपणे तुमच्या चॅटचा बॅकअप घेतला जातो. नवीन स्मार्टफोनमध्ये स्विसच करायचे असेल तर व्हॉट्सअॅप अकाउंटला डिलीट करताना आपल्याला डिलीट झालेले व्हॉट्सअॅप मेसेजेसला रिकवर करणे असते.
अशी आहे स्टेप
1) चॅट बॅकअप चालू करण्यासाठी व्हॉट्सअॅप उघडा. सेटिंग्सवर जा. चॅटवर जा. चॅट बॅकअपवर टॅप करा.
2) तुम्ही नेवर, डेली, विकली किंवा मंथली ऑप्शनसोबत आपल्या चॅट बॅकअपची फ्रीक्वेन्सी सेट करू शकता. तुम्ही मॅन्यूअली बॅकअप स्टोर करू शकता.
3) याशिवाय, जर तुम्हाला अँड्रॉयड स्मार्टफोनचा वापर करायचा असाल तर तुम्ही गुगल अकाउंटला सिलेक्ट करा. त्यावरून बॅकअप स्टोर केले जाते.
4) आयफोन युजर्ससाठी व्हॉट्सअॅपवर जा. त्यानंतर चॅट्स, नंतर चॅट बॅकअप च्या आतील सेटिंग्स मध्ये जा. या ठिकाणी ऑटो बॅकअप फ्रिक्वेंसी सिलेक्ट करा. बॅकअपचा वापर करा. मॅन्यूअल रुपाने iCloud वर बॅकअप घेऊ शकता.