आता लाकडापासून बनणार मोबाईलचा डिस्प्ले; कसे ते पहा

Mobile Display Wood
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल मोबाईल (Mobile) ही सर्वांची मूलभूत गरज बनली आहे. चांगला मोबाईल घेण्यासाठी अनेकजण त्या मोबाईलची रॅम, रोम, बॅटरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईलचा श्वास असलेला डिस्पले हा चांगल्या दर्जाचा हवा असतो. डिस्प्ले चांगला असेल तर मोबाईलची स्क्रीन चांगली दिसते. तुम्ही मोबाईलचा डिस्प्ले हा आत्तापर्यंत काच आणि प्लास्टिकचा पहिला असेल. त्याप्रकारचा तुम्ही वापरत ही असाल. मात्र आता स्मार्टफोनचा डिस्पले हा चक्क लाकडाचा होणार आहे. तो कसा ते जाणून घेऊयात.

इपॉक्सी रेझिन वापरुन या लाकडाला बनवले पारदर्शक

सायंटिफिक अमेरिकनच्या एका रिपोर्ट मध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये लाकडाला कसे पारदर्शक बनवता येईल याबाबत संशोधन सुरु आहे. त्यासाठी संशोधकांनी लाकडातून Lignin नावाचा एक पदार्थ काढून टाकण्याचं तंत्र विकसित केल आहे. Lignin हा पदार्थ डिंकाप्रमाणे दिसतो. याचे काम जमिनीतील पाणी आणि पोषक तत्वांना झाडामध्ये सर्व ठिकाणी पोहचवण्याचे आहे. या पदार्थामुळे झाडाला विटकरी रंग प्राप्त होतो. त्यामुळे झाडामध्ये जर हा पदार्थ नसेल तर झाड हे पारदर्शक बनू शकते. त्यासाठी इपॉक्सी रेझिन हा घटक वापरून मोबाईलचा डिस्प्ले जसा पारदर्शक असतो तसा बनवता येणार आहे. असा दावा करण्यात आला आहे.

इपॉक्सि रेझीन वापरल्यानंतर झाडाचा पारदर्शकपणा हा 80 ते 90 टक्क्यांपर्यंत वाढतो. यामुळे जेवढा जास्त थर तेवढे जास्त लाकूड अपारदर्शक होते. म्हणजेच यामुळे पातळ थरही प्लास्टिकपेक्षा तीन पट आणि काचेपेक्षा 10 पट अधिक मजबूत असेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या काचेच्या डिस्प्ले पेक्षा लाकडाचा डिस्प्ले हा अधिक मजबूत आणि टिकाऊ होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत स्वीडनच्या केटीएच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च सुरू आहे.

केटीएचचे लार्स बर्गलुंड आणि मॅरिलँड विद्यापीठाचे काही रिसर्चर मिळून करतायेत संशोधन

या नवीन प्रयोगास अस्तित्वात आणण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून केटीएचचे लार्स बर्गलुंड आणि मॅरिलँड विद्यापीठाचे काही रिसर्चर मिळून हे संशोधन करत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, झाडापासून मोबाईलचा डिस्पले तयार केला जाणार मग हे इको फ्रेंडली असेल का? तर त्याच उत्तर आहे नाही. कारण पारदर्शक बनवण्यासाठी वापरण्यात येणारे इपॉक्सी रेझिन हा एक पेट्रोलियमपासून तयार करण्यात आलेला पदार्थ आहे, जो प्लास्टिकपासून बनवला जातो. त्यामुळे नक्कीच भविष्यात तुमच्या मोबाईलचा लाकडाचा डिस्प्ले हा पर्यावरणाला पूरक नाही.