ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता टेस्ट देण्याची गरज नाही; केंद्राने आखली ‘ही’ योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (driving license) ड्रायविंगची टेस्ट देणं म्हणजेच परीक्षा देणं अनिवार्य आहे. मात्र, आता केंद्रानं वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या पद्धतीत एक मोठा बदल केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या तरतूदीनुसार, वाहन चालवण्यासाठी आता कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट (test for driving license) देण्याची गरज नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमधून गाडी शिकत असाल तर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला टेस्ट देण्याची काही गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात या खास योजनेवर काम सुरू असून मंत्रालयाने यासाठी अधिसूचनाही जारी केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, ग्राहकांना यावर सल्ला विचारला जाणार आहे.

या योजनेंतर्गत मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देणार जेणेकरून ते त्याची अंमलबजावणी करतील. यासाठीदेखील मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पण खास सेवेसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. या योजनेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment