औरंगाबाद | जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत आता दररोज सुरू राहणार असून प्रतिदिन फक्त एक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. आता लेणी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पर्यटकांसाठी सुरू असणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांना सकाळी सात ते चार वाजेपर्यंत परवानगी दिली आहे.
यापूर्वी लेणीमध्ये दोन हजार पर्यटकांना प्रवेश देण्याचे आदेश होते मात्र कोरोना संसर्गामुळे आता यात निम्म्याने घट करण्यात आली आहे. सकाळी सात ते चार या वेळेत सर्व पर्यटनस्थळांना परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळी पाच वाजेच्या नंतर कोणालाही कुठलाही व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आता दिवसाला एक हजार पर्यटक प्रवेश करतील. सकाळी 500 दुपारी 500 अशा अशा दोन टप्प्यात एक हजार पर्यटकांना प्रवेश भेटणार आहे. दुपारी तीन वाजता तिकीट काउंटर बंद करण्यात येणार आहे. तीन नंतर कोणालाही तिकीट भेटणार नसून प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. 4 वाजता सर्व पर्यटकांना बाहेर काढून लेणी बंद करण्यात येणार आहे.