आपली लढाई लबाड लोकांशी आहे – चित्रा वाघ

0
90
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणीत वाघ यांचा विरोधकांवर घणाघात

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

    पाच वर्षापासून सत्तेवर आलेल्या लोकांनी देशात महागाई बेकारी वाढविली तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून सत्तेवर आलेल्या लबाड लोकांशी आपली लढाई आहे असे प्रतिपादन महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ पाथरी येथील जाहीर सभेत मंगळवार ९ एप्रिल रोजी केले.

      चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की “मोदी सरकारने उज्वला योजनेतून गॅस दिले पण ते भरण्यासाठी गरिबांनी आठशे रुपये आणायचे कसे ?असा सवालही सत्ताधाऱ्यांना विचारला. दिवाळीत गोरगरीब जनतेच्या चुली पेटू नये म्हणून राशनचे तेल ,साखर बंद केले. देशात महागाई वाढवली, तरुणांच्या हाताला काम मिळत नाही ,अशी परिस्थिती आज देशाची झालेली आहे .महाराष्ट्र सक्षमीकरण करण्याचे काम फक्त शरद पवार साहेबांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद केंद्रात वाढवण्यासाठी आपणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना विजय करावयाचे आहे” असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

     यावेळी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा भावना नखाते म्हणाल्या महाराष्ट्रात दुष्काळ असताना सरकार दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही.जातीपातीचे राजकारण करून आपली मतांची पोळी भाजण्याचे काम जातीयवादी पक्ष करीत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

   यावेळी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीेच्या अध्यक्षा भावना नखाते, नगराध्यक्षा मीना भोरे, पंचायत समिती पाथरीच्या सभापती शिवकन्या ढगे, कमल राठोड ,यमुना रासवे ,कल्पना थोरात, वनिता चव्हाण, रेखा निकाळजे, सुनंदा फलके ,मीरा सरोदे आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या. ९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी झरी येथे राजेश विटेकरांच्या प्रचारार्थ सभा घेतली तर सायंकाळी महिलांच्या रॅलीत परभणी शहरात सहभाग घेत प्रचार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here