चीनमध्ये आता हंता व्हायरसचे नवीन प्रकरण,याची लक्षणे आणि प्रतिबंध काय आहेत ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूनंतर, आणखी एका विषाणूमुळे जगभरात घबराट पसरली आहे. जगभरात कोरोना विषाणूच्या भीतीमुळे लोकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार चीनमध्ये हंता व्हायरसमुळे २३ मार्च रोजी एका व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ज्या बसमध्ये हंता विषाणूची लागण झालेली व्यक्ती होती, त्या बसमध्ये असलेल्या ३२ जणांची चाचणी घेण्यात आली. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.हंता विषाणूचे हे प्रकरण अशा वेळी घडले आहे जेव्हा संपूर्ण जग वुहानपासून उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या साथीने झगडत आहे.

हंता व्हायरस म्हणजे काय?

तज्ञांच्या मते, उंदीरांच्या संसर्गामुळे हा विषाणू मनुष्यात पसरतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने आपल्या संकेतस्थळावर असे सांगितले आहे की हंता विषाणूच्या संक्रमनाचे प्रसार होण्याचे मुख्य कारण उंदीर हा असू शकतो. जरी एखादी व्यक्ती पूर्णपणे निरोगी असेल तरीही त्यास या विषाणूची लागण होण्याचा धोका असतो.

तथापि, सामान्यत: हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरत नाही.याचा संसर्ग होण्यास एक ते आठ आठवडे लागू शकतात. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीने उंदराच्या बिळाच्या ठिकाणी असलेल्या गोष्टी जसे कि उंदराची विष्ठा किंवा मूत्र किंवा इतर वस्तूंना कळत अथवा नकळत स्पर्श करून आपले डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श केला तर या विषाणूचा संसर्ग त्यांना होऊ शकतो. कोरोना विषाणूप्रमाणे हा विषाणू हवेतून पसरत नाही.

हंता विषाणूची लक्षणे

कोरोना व्हायरस आणि हट्टा विषाणूची लक्षणे एकसारखीच आहेत. दोन्ही परिस्थितींमध्ये ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण, शरीरावर वेदना आहे. याशिवाय हंता विषाणूची लागण झाल्यास पोटदुखी, उलट्या, अतिसार देखील होतो.

हंता व्हायरस सुरुवात

हंता विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना दक्षिण पश्चिम अमेरिकेत मे १९९३ मध्ये झाली. हे अरिझोना, न्यू मेक्सिको, कोलोरॅडो आणि युटा क्षेत्र होते. सीडीसीने आपल्या अहवालात कॅनडा, अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, चिली, पनामा, पराग्वे आणि उरुग्वे येथेही अशाच प्रकारच्या घटनांची पुष्टी केली आहे. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, हंता विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण ३८ टक्के आहे आणि या रोगाचा कोणताही ‘विशिष्ट उपचार’ असा नाही.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

Leave a Comment