आता रेशनकार्डची ही सेवा होणार बंद; शासनाकडून नवी प्रणाली सुरू

Ration Card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रेशनकार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या काळात रेशनकार्ड प्रिंट स्वरूपात उपलब्ध होणार नाही. रेशनकार्डाची छपाई बंद करण्यात आली असल्यामुळे राज्यातील नागरिकांना आता ई-रेशनकार्डचा पर्याय वापरावा लागणार आहे. याबाबतची माहिती नागपूर जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी दिली आहे.

परंतु याचा परिणाम जुन्या रेशनकार्डधारकांवर होणार नाही. त्यांना जुन्यास रेशनकार्डवरून योजनांचा लाभ घेता येईल. मात्र, नव्या अर्जदारांना प्रिंट स्वरूपात रेशनकार्ड दिले जाणार नाही. याऐवजी ई-रेशनकार्ड प्रणाली लागू करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, ई-रेशनकार्डमध्ये पिवळे, पांढरे आणि केशरी रंगाच्या कार्डचा देखील समावेश असणार आहे. यामुळे लाभार्थी कोणत्या गटात येतात हे समजेल.

दरम्यान, रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंकिंग अनिवार्य करण्यात आल्याने सर्व नोंदी डिजिटल माध्यमातून व्यवस्थापित केल्या जात आहेत. परिणामी प्रिंट स्वरूपातील रेशनकार्डची गरज कमी झाली आहे. राज्य सरकारकडे उरलेली शिधापत्रिका वाटप झाल्यानंतर फक्त ई-रेशनकार्ड प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. परिणामी, ई-रेशनकार्डमुळे डिजिटल पारदर्शकता वाढेल.