आता कोरोनातून बरे झालेल्यांना लसीकरणासाठी 9 महिने करावी लागणार प्रतीक्षा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोनाशी लढा देण्यासाठी संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच दरम्यान लसीकरणाच्या नियमांमध्ये सतत बदल होत आहेत. आता जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याला रिकव्हर होऊन नऊ महिने झाल्यानंतरच लस घेता येणार आहे. अशी माहिती समोर येते आहे. नॅशनल ग्रुप ऑन वॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे NEGVAC लवकरच याबाबत निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. नुकताच रिकवरी नंतर लसीकरणाचा कालावधी सहा महिने करण्यात आला होता मात्र आता हा कालावधी आणखी वाढून तो नऊ महिने करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बरे झाल्यानंतरही इन्फेक्शनचा धोका

अनेक बाबींची पडताळणी केल्यानंतर तज्ञांच्या टीमने हा सल्ला दिला. भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान इन्फेक्शनचा रेट 4.5 टक्के होता. या दरम्यान १०२ दिवसांचे अंतर पाहायला मिळाले होते. काही देशांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात असं समोर आले आहे की, कोरोनाची लागण झाल्यानंतर सहा महिन्यापर्यंत या विरोधात प्रतिकारशक्ती राहू शकते. सध्या कोरोनाचा प्रसार सुरू असला ना तरी इन्फेक्शन चा धोका कायम आहे.

दुसऱ्या डोस करीता प्रतीक्षा

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोस साठी 12 ते 16 आठवड्यांची प्रतीक्षा आता करावे लागेल. पोर्टल वर ही आता दुसरा डोस साठीचा पर्याय चौऱ्याऐंशी दिवसानंतरचा दिसत आहे. तर कोरोनातून रिकवर झालेल्या व्यक्तींना पहिले सहा महिने लस घेता येणार नव्हती. मात्र आता हा देखील कालावधी वाढवून नऊ महिने केला जाऊ शकतो. तर गर्भवती महिलांकडे डिलिव्हरी नंतर लस घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. गर्भवती महिलांना कोरोना वॅक्सिन करता येत नाही.