NPS Scheme च्या ई-नॉमिनेशन प्रक्रियेत मोठा बदल, खातेदारांवर काय परिणाम होईल ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NPS Scheme : पेन्शन नियामक PFRDA आणि IRDAI कडून वेळोवेळी NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीचे नियमांत बदल केले जात असतात. आताही सरकारी आणि खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या ई-नॉमिनेशनची प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, आता नोडल अधिकारी आपला अर्ज मंजूर किंवा नाकारू शकतो. जर नोडल ऑफिसरने आपल्या ई-नॉमिनेशन अर्जावर 30 दिवसांच्या आत काही कारवाई केली नाही, तर सदर अर्ज हा सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सीकडे सोपवला जाईल.

National Pension Scheme - NPS Account Returns and Benefits in 2022

1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू होणार आहे. या आधी देखील IRDAI ने मॅच्युरिटीच्या वेळी एन्युइटी घेण्यासाठी वेगळा फॉर्म भरण्याची प्रक्रिया रद्द केली होती. त्याचबरोबर PFRDA कडून ऑगस्टमध्ये टियर 2 शहरांमधील एनपीएस खातेधारकांसाठी क्रेडिट कार्डद्वारे NPS मध्ये योगदान देण्याची सुविधा रद्द करण्याचा आदेश जारी केला होता. NPS Scheme

सबस्क्राइबरच्या मृत्यूनंतर नॉमिनी बदलता येणार नाही

22 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या एका सर्क्युलरमध्ये PFRDA ने म्हटले की, खातेदाराच्या मृत्यूनंतर, नॉमिनी व्यक्तीच्या लॉगिन डिटेल्सचा वापर करून त्याच्या नावात केलेली दुरुस्ती व्हॅलिड राहणार नाही. PFRDA नुसार, फक्त सदस्यांनाच नॉमिनीची निवड करता येईल. तसेच खातेदाराच्या मृत्यूनंतर काही बदल झाल्यास तो इनव्हॅलिड घोषित केला जाईल आणि पैसे आधीच रजिस्टर असलेल्या नॉमिनीला दिले जातील. जर खातेदाराने नॉमिनीची नोंदणी केली नसेल तर पैसे त्याच्या कायदेशीर वारसदाराकडे पाठविले जातील. NPS Scheme

Subscriber base of NPS, APY up 22% to 4.05 cr at Jan-end 2021: PFRDA | Mint

नियोक्त्याच्या रेकॉर्डमध्ये नॉमिनी व्यक्ती

नियम 3(c) अंतर्गत समाविष्ट असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील सदस्यांचा मृत्यू झाल्यास आणि नियम 4(c) अंतर्गत समाविष्ट असलेल्या कॉर्पोरेट सदस्यांचा नॉमिनीशिवाय मृत्यू झाल्यास, नियोक्त्याकडे असलेल्या कर्मचार्‍यांच्या नोंदी तपासल्या जातील. जिथे नॉमिनी व्यक्तीची नोंद आढळल्यास सदर व्यक्तीला NPS साठी नॉमिनी मानले जाईल. ज्यानंतर सर्व बेनेफिट्स त्याच्याकडे ट्रान्सफर केले जातील. NPS Scheme

Consolidated instructions on Life Certificate and commencement of family pension if pensioner / family pensioner is living abroad | PO Tools

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट

हे लक्षात घ्या कि, NPS द्वारे पेन्शन मिळवणाऱ्या प्रत्येक खातेदाराला दरवर्षी लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. आता पेन्शनधारकाला लाइफ सर्टिफिकेट सर्व्हिसेसचा वापर करून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन सबमिट करू शकता. यासह, इन्शुरन्स रेग्युलेटरने सर्व विमा कंपन्यांना आधार-वेरिफाईड लाइफ सर्टिफिकेट स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. NPS Scheme

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा