नवी दिल्ली । तुम्ही सरकारच्या नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता NPS मेंबर वर्षातून चार वेळा त्यांच्या गुंतवणुकीचा पॅटर्न बदलू शकतील. पेन्शन फंड रेग्युलेटर PFRDA चे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय यांनी मंगळवारी सांगितले की,”लवकरच नवीन पेन्शन योजनेच्या ग्राहकांना आर्थिक वर्षात चार वेळा गुंतवणूकीची पद्धत बदलण्याची परवानगी दिली जाईल.”
सध्या ‘हे’ नियम आहेत
सध्या NPS मेंबर्सना आर्थिक वर्षात फक्त दोनदा गुंतवणूक पॅटर्न बदलण्याची परवानगी आहे. ही मर्यादा वाढवण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. बंदोपाध्याय यांनी NPS वर ASSOCHAM ने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सांगितले की,”सध्या भागधारक वर्षातून फक्त दोनदा गुंतवणूक पर्याय बदलू शकतात. लवकरच, आम्ही ते चार पर्यंत वाढवणार आहोत. ते चार पर्यंत वाढवण्याच्या अनेक विनंत्या आम्हाला मिळाल्या आहेत.”
ते म्हणाले की,”PFRDA हे देखील सावध करू इच्छितो की, NPS ही पेन्शन कॉर्पस तयार करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक (उत्पादन) आहे आणि ती म्युच्युअल फंड योजना म्हणून मानली जाऊ नये.”
असे बदल करू शकतात ?
गुंतवणूकदार NPS मध्ये गुंतवलेले पैसे सरकारी सिक्युरिटीज, डेट ऑप्शन्स, शॉर्ट टर्म डेट फंड आणि इक्विटीमध्ये गुंतवणुकीसाठी विभागू शकतात. मात्र, सरकारी कर्मचारी इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक करू शकत नाहीत तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना इक्विटीमध्ये 75 टक्के गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. या बदलामुळे, गुंतवणूकदारांना वेळोवेळी वेगवेगळे गुंतवणूक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल, जेणेकरून त्यांना चांगला रिटर्न मिळू शकेल.
‘ही’ सरकारी योजना काय आहे जाणून घ्या
NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम ही भारत सरकारची पेन्शन योजना आहे. NPS ही एक प्रकारची पेन्शन कम गुंतवणूक योजना आहे जी बाजार आधारित परताव्याची हमी देते. E-E-E म्हणजेच योगदान-इन्वेस्टमेंट-रिटर्न आणि पैसे काढणे या तिन्ही स्तरांवर NPS करमुक्त आहे. रिटर्न बद्दल बोलायचे झाल्यास, NPC ने गेल्या 12 वर्षात 12 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.