जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 169 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 4176 झाली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 141 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 2476 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात सध्या 1437 बाधित रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 263 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्रात ७ जुलैच्या पहाटे ५ ते १३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता ही क्षेत्रे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज जाहीर केले.
जळगांव जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या ही शंभरच्या पुढेच मिळत असल्याने आज जिल्हाधिकारी राऊत यांनी सदर लॉकडाउन जारी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येणा-या संशयित रुग्ण शोध पंधरवाड्यात त्वरित निदान, त्वरीत तपासणी, त्वरित उपचार (ट्रेस, टेस्ट व ट्रीट) या ट्रीपल ‘टी’ तत्वांचा अवलंब करण्यात येत असल्याने रुग्णसंख्या ही वाढत आहे.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 141 #कोरोना बाधित रूग्ण बरे झाले. आतापर्यंत 2476 रूग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात आज दिवसभरात 169 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 4176 झाली. जिल्ह्यात सध्या 1437 बाधित रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 263 रूग्णांचा मृत्यू झाला pic.twitter.com/ObJOoAPc3z
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 4, 2020
#जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिका, #भुसावळ आणि #अमळनेर नगरपालिका क्षेत्रात ७ जुलैच्या पहाटे ५ ते १३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी @abhijitraut10 यांनी जाहीर केला #lockdown #StayHomeStaySafe @MLA_AnilPatil @SanjaySawkare pic.twitter.com/vMTDvCOHhi
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 4, 2020