कोरोना वाढतोय!! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ

Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात तब्बल 12 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्येचा हा सर्वोच्च आकडा आहे. त्यामुळे निश्चितच लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशात काल तब्बल 12,213 नवे कोरोना रुग्ण सापडले तर 7624 जणांनी काल कोरोना वर मात केली आहे. सध्या भारतात 58215 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा 2.35% आहे.

दरम्यान, देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, केरळ आणि मध्ये आहे. या 5 राज्यात तब्बल 82% कोरोना रुग्ण असून या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या तब्बल 32.95% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या राजधानी मुंबईत आहे.