हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शालेय विद्यार्थ्यांबाबत एक प्रश्न नेहमीच सगळ्यांना सतावत असतो. तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकार तसेच शाळा प्रयत्न करत असते. आता हे ओझे कमी होण्याऐवजी जास्त वाढणार असल्याचे अंदाज येत आहे. कारण आता दहावी अभ्यासक्रमात मोठ्या बदल होणार आहे. आणि आता विद्यार्थ्यांना 7 ऐवजी 15 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे शाळांची वेळ देखील वाढण्याची शक्यता असते.
नववी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना 7 ते 8 विषय होते. परंतु आता आराखड्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यात अजून व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, अंतर्गत विद्या शाखा विषय बंधनकारक असणार आहेत. तसेच तीन भाषा विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि नव्याने सामील केलेले हे तीन विषय असे दहा विषय असणार आहेत. यासोबत त्यांना स्काऊट गाईड देखील बंधनकारक केलेले आहे.
सरकारने हा नवीन हे नवीन शैक्षणिक धोरण केलेले आहे. यामध्ये भारतीय भाषांचा समावेश सक्तीने केलेला आहे. शाळांकडून याबाबत सूचना आल्यानंतरच हा अभ्यासक्रमाचा निर्णय लागू केला जाणार आहे. तसेच व्यावसायिक शिक्षणामध्ये नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरुस्ती, सौंदर्य या व्यवसायांची ओळख करून देण्यात येणार आहे. तर दहावीला बाग, सुतार काम, परिचय यांसारख्या व्यवसायाची माहिती देण्यात आली आहे. कला शिक्षणातून दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला हे विषय शिकवण्यात येणार आहेत.
दहावीमध्ये आता तीन भाषांच्या विषयांची सक्ती असणार आहेम यामध्ये दोन भाषा भारतीय असणे गरजेचे आहे. अकरावी बारावी एक ऐवजी दोन दिवसांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यातही एक भाषा भारतीय असणार आहे. तसेच नववी आणि दहावीमध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी विषयांची संख्या देखील वाढवली आहे. पाच ऐवजी आता दहा विषय शिकावे लागणार आहे. त्यामुळे आता शाळेच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.